people support modi amit shah | Sarkarnama

जनता खडकासारखी मोदींच्या पाठीशी उभी : अमित शहा : 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांचा भक्कम पाठिंबा आहे; पण विरोधकांच्या आघाडीचे नेते कोण आहेत, असा सवाल करत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेससह विरोधकांवर टीका केली. 

भारत महासत्ता होण्याच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीत आगामी निवडणूक ही महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत शहा यांनी मांडले.

शहांच्या हस्ते आज "मेरा परिवार भाजपा परिवार' या मोहिमेला सुरवात झाली. यानिमित्त आयोजित सभेत कार्यकर्ते आणि नेत्यांना आयोजित सभेत ते बोलत होते. 

शहा म्हणाले, ""महाआघाडीमध्ये केवळ राज्यपातळीवरील प्रादेशिक नेत्यांचा समावेश असून यामुळे भाजपवर कसलाही परिणाम होणार नाही. विरोधकांनी त्यांचा पंतप्रधानपदाचा चेहरा आणि नेता आधी जाहीर करावा. लोकांची सेवा करण्यासाठी मोदींना पूर्ण बहुमत मिळणे गरजेचे आहे. मी देशभर फिरलो तेव्हा मला हेच चित्र पहायला मिळाले की, लोक भक्कम खडकासारखे मोदींच्या पाठीशी उभे आहेत. लोकांच्या डोळ्यांत मोदींविषयीची प्रेमभावनाच मला यानिमित्ताने पहायला मिळाली.'' 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख