राज्यातील लोकांनी आम्हाला नाकारले नव्हते - चंद्रकांतदादा पाटील

.............
राज्यातील लोकांनी आम्हाला नाकारले नव्हते - चंद्रकांतदादा पाटील

औरंगाबाद : पाच वर्ष आम्ही चांगले काम केल्यानेच लोकांनी आम्हाला नाकारले नाही, विधानसभेत भाजपला 105 जागा मिळाल्या एक कोटी 42 लाख मते मिळवत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे असाच विश्वास औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवा, शहराचे चित्र बदलू असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. 

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. यामध्ये शहरातील उद्योजक, व्यापारी, वकील, सीए, डॉक्‍टर व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्याशी संवाद साधला. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, सुजितसिंग ठाकूर,आमदार अतुल सावे, डॉ. भागवत कराड, विजय औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत प्रचार सभा घेण्याऐवजी लोकांमध्ये जाऊन संवाद साधत त्यांना काय हवे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या संवादातून काय उपाय योजना येतील ते लिहून घेत आहेत व त्यातून चारपानी जाहीरनामा काढणार आहे. जाहीरनाम्यात प्रामुख्याने रस्ते रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजेत यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार असल्याचे पाटील म्हणाले. 

स्थगिती सरकारने पर्यायी योजना कराव्यात 
हे सरकार स्थगिती सरकार आहे, स्थगिती द्या पण काहीतरी पर्याय काढा. मराठा समाजासाठी सारथी संस्था केली आहे यामुळे अनेक मुलांना फेलोशिप मिळाली. सारथी ला विरोध करताय सारथी ऐवजी पारथी काढा, मराठवाडा वॉटर ग्रीड विरोध करत आहे, यांचे नाव आवडत नसेल तर मराठवाडा फ्रीड करा असा टोलाही महाविकास आघाडी सरकारला पाटील यांनी लगावला. 

मित्र पक्ष लढणार भाजप चिन्हावर 
विधानसभेचे प्रमाणे महापालिका निवडणुकीत भाजप सोबत असलेले आरपीआय व शिवसंग्राम उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com