देशाला राफेलची किंमत कळायलाच हवी : शरद पवार

भारतीय जनता पक्षाच्या सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. कामगारांबद्‌दल आदर नाही. केवळ अदानी व अंबानी यांच्या हिताची जोपासना करणारे हे सरकार म्हणजे शेतकरी व कामगारांवरची राष्ट्रीय आपत्ती आहे.
SHARAD_PAWAR_MODI
SHARAD_PAWAR_MODI

मुंबई:  "  देशाच्या संरक्षणासाठी राफेल खरेदी केले याबाबत कोणाला शंका नाही. पण या विमानाची खरेदी किंमत देशाच्या जनतेला कळणे हा अधिकार आहे,"  असा घणाघात  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  शेतकरी परिषदेत बोलताना भाजप सरकारवर केला . यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे आज डाव्या पक्षांच्या किसान सभेच्या वतीने शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख वक्‍ते म्हणून पवार बोलत होते.

श्री. पवार राफेल विमान खरेदी करारावर बोलताना म्हणाले," भाजपच्याच केंद्रीय राज्यमंत्र्यानी संसदेत या विमानाची किंमत 670 कोटी असल्याचे सांगितले होते. तर, त्यांच्याच दुसऱ्या जेष्ठ मंत्र्यांनी किंमत 1400 कोटी असल्याचे सांगितले. ही तफावत का ? केवळ अंबानी समुहाला फायदा पोहचवण्यासाठीच हा करार केल्याची शंका देशाच्या जनतेच्या मनात आहे . "

भारतीय जनता पक्षाच्या सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. कामगारांबद्‌दल आदर नाही. केवळ अदानी व अंबानी यांच्या हिताची जोपासना करणारे हे सरकार म्हणजे शेतकरी व कामगारांवरची राष्ट्रीय आपत्ती आहे. या सरकारला उलथवून  टाकण्यासाठी मतभेद विसरून एकत्र यावे ," असे आवाहन  श्री .  पवार यांनी  केले. 

" सध्या देशात दुष्काळाचे सावट भिषण असताना या सरकारला राम मंदिराची समस्या भेडसावत आहे. पिण्याचे पाणी नाही. जनावरांना चारा नाही. हाताला रोजगार नसताना आश्‍वासनांचा हिशोब देण्याची वेळ आली, तेंव्हा राम मंदिराच्या नावाने देशात विद्‌वेष पसरवण्याचे कारस्थान भाजप करत आहे," अशी आक्रमक टीका पवार यांनी केली.

श्री .  पवार म्हणाले,"मोदीच्या राज्यात भारताची निर्यात 22 टक्‍क्‍यांनी घटली आहे. त्यामुळे शेतकर्यांना मिळणाऱ्या 61 हजार कोटीच्या परकिय गंगाजळीवर पाणी सोडावं लागले. तर 65 टक्‍क्‍यांनी आयात वाढल्यानं व्यापार्यांच्या हातात भारतीय चलनाची रक्कम गेली. हे सगळं धोरण देशासमोरचं सर्वात मोठं संकट आहे. पण, भाजप सरकारला मात्र मंदिर मशिदीच्या नावावरून समाजात फुट पाडण्याचं काम महत्वाचं वाटत आहे." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com