मेणबत्त्या पेटवून मोबाईल आणि टॉर्चचे प्रकाशझोत झळकवून कोरोनाचा अंधकार दूर करण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आव्हानानुसार रात्री बरोबर नऊ वाजता सर्व घरांमधल्या लाईटस ऑफ व्हायला लागल्या आणि मेणबत्यांचा मंद प्रकाश बाल्कन्यांमधून पसरला.... टॉर्चचे प्रकाशझोत अन् मोबाईलचे फ्लॅश सुरू झाले... दिवे बंद केल्याने अंधारात गेलेल्या बाल्कन्या मेणबत्त्या, मोबाईल फ्लॅश आणि टॉर्चच्या प्रकाशाने न्हाऊन निघाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या बाल्कनीत कोरोनाचा अंधार दूर होण्यासाठी रविवारी पाच एप्रिल 2020 रात्री 9 वाजता मेणबत्त्या पेटवल्या.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या बाल्कनीत कोरोनाचा अंधार दूर होण्यासाठी रविवारी पाच एप्रिल 2020 रात्री 9 वाजता मेणबत्त्या पेटवल्या.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आव्हानानुसार रात्री बरोबर नऊ वाजता सर्व घरांमधल्या लाईटस ऑफ व्हायला लागल्या आणि मेणबत्यांचा मंद प्रकाश बाल्कन्यांमधून पसरला.... टॉर्चचे प्रकाशझोत अन् मोबाईलचे फ्लॅश सुरू झाले... दिवे बंद केल्याने अंधारात गेलेल्या बाल्कन्या मेणबत्त्या, मोबाईल फ्लॅश आणि टॉर्चच्या प्रकाशाने न्हाऊन निघाले. 

कोरोनाच्या अंध:काराला दूर करीत अशाही आणिबाणीच्या प्रसंगी झटणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलिस आणि तत्सम घटकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यात कोणीही हात आखडता घेतला नाही.     

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी #9pm9minute असे ट्विट करीत सर्वांना आजच्या रात्रीच्या कार्यक्रमाची आठवण करून दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी सकाळी 9 वाजता देशाला उद्देशून भाषण केले होते. त्यात त्यांनी पाच एप्रिलला 130 भारतीयांकडून पाच एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे मागितली होती. 
या काळात कोरोनाच्या अंध:काराशी लढण्यासाठी त्यांनी देशवासियांना महासंकल्प दिला आहे.

5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील सर्व लाइटस बंद करा आणि दरवाजात किंवा बाल्कनीत या.  मेणबत्ती, दिवा, टाॅर्च किंवा मोबाईल फ्लॅश लाइट नऊ मिनिटे झळकवा. यातून कोरोनाशाचा अंधकार दूर  होऊन प्रकाशाकडे आपण मार्गक्रमण करू. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जिंकण्याची शक्ती यातूनच मिळणार आहे, असेही मोदी यांनी लोकांशी बोलताना सांगितले. 

या वेळी जनता कर्फ्यूबरोबरच लाॅकडाऊनच्या काळात दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले होते. आज पुन्हा रात्रीच्या उपक्रमाची आठवण त्यांनी देशवासियांना करून दिली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com