`इंदापूरची जनता अजित पवारांना विसरणार नाही`

bharane-ajit-pawar
bharane-ajit-pawar

वालचंदनगर : नीरा देवघर व गुंजवणी धरणाच्या पाण्याच्या फेरवाटपाच्या निर्णयामुळे इंदापूर,बारामती व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणीवाटपाचा निणर्याचा सर्वाधिक फायदा  इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असून सर्वसामान्य शेतकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कधी विसरणार नसल्याचे प्रतिक्रिया राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

इंदापूर व बारामतीचे अर्थकारण व राजकारण नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावरती अवलंबून असते. भाजप सरकारने विधानसभा निवडणूकीपूर्वी नीरा देवघर व गुंजवणी धरणाच्या पाण्याचे फेरनियोजन केल्यामुळे इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना  मार्चनंतर सुरु होणाऱ्या ऐन उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार होते. इंदापूर तालुक्यातील ४६ क्रमांकाच्या वितरिकेच्या खालील २२ गावातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पाणी मिळण्याची शास्वती नसल्याने हजारो एकर क्षेत्रावरती पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला होता.

कालव्याचे पाणी मिळणार नसल्यामुळे शेतकरी पिकपद्धती बदलण्याच्या विचारामध्ये होते. आमदार दत्तात्रेय भरणे यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वीपासून नीरा डाव्या व उजव्या कालव्याच्या पाण्याचा समतोल राखण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. राज्यामध्ये महा विकास आघाडीचे सरकार आल्यामुळे भरणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नीरा डाव्या कालव्याला ५५ टक्के व उजव्या कालव्याला ४५ टक्के पाणी उपलब्ध होणार असल्याने  उन्हाळ्यामध्ये नीरा डाव्या कालव्याला   सुमारे ५ टीएमसी  वाढीव पाणी साठा मिळणार आहे. नीरा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पुरंदर,बारामती व इंदापूर तालुक्याचा समावेश असून ३७ हजार ७० हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक जास्त क्षेत्र असून तालुक्यातील २२ गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. शासनाच्या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून इंदापूरकरांचा दुष्काळ हटणार आहे.

चालू वर्षी धरणामध्ये चांगला पाणी आहे. तालुक्यातील २२ गावासह सर्वच शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये कालव्याचे पाणी मिळणे गरजचे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांंना मुबलक पाणी मिळणार असल्याने इंदापूरकर अजितदादांना  कधीच विसरणार नसल्याचे भरणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com