`अजितदादांची एक्स्प्रेस आहेच...हे मंत्री पण चांगले काम करतात!`

....
rohit pawar about new ministers
rohit pawar about new ministers

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रालयात काय बदल झालाय, याचे उत्तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे. सध्या मंत्रालयात लोकांना न्याय मिळतोय, असा दावा रोहित यांनी नोंदविला आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की माझ्या मतदारसंघातील लोकांच्या किंवा वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रश्नांसंदर्भात मी मंत्रालयात नेहमीच जात असतो. यावेळी अनेक मंत्र्यांना भेटण्याची, त्यांच्या बैठकांना बसण्याची संधीही मला मिळते. अजितदादांची कामाची 'बारामती एक्सप्रेस' तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यांच्याशिवाय इतर मंत्रीही चांगले काम करत असल्याचे रोहित यांनी म्हटले आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह शिवसेना आणि काॅंग्रेस या पक्षांच्या मंत्र्यांचीही नावे यासाठी घेतली आहेत.

यात जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे, अनिल परब, अनिल देशमुख,  गुलाबराव पाटील,  बाळासाहेब पाटील साहेब, अमित देशमुख, सुनील केदार साहेब, शंभूराज देसाई, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, अस्लम रमजान अली शेख  या नव्या-जुन्या मंत्र्यांची कामे रोहित यांनी गेल्या काही दिवसांत जवळून पाहिली. त्यावरून त्यांनी हा दावा केला आहे.

ठ्या अपेक्षेने मंत्रालयात आलेल्या प्रत्येक नागरिकाशी चर्चा करुन त्याचं म्हणणं ऐकून घेणं आणि संबंधित अधिकाऱ्याशी सल्लामसलत करुन त्या नागरिकाला न्याय कसा देता येईल याचा प्रयत्न करणं यावर या सगळ्या मंत्र्यांचा भर असतो. हे पाहत असताना मंत्रालय हे लोकांची अडवणूक करण्याचं नाही तर प्रश्नांची सोडवणूक करण्याचं हक्काचं ठिकाण कसं बनलंय हेही मला पहायला मिळतं. काही सर्वसामान्य लोक मला मंत्रालयात भेटले तेंव्हा 'आतापर्यंत आमच्याकडं कोणी लक्ष दिलं नाही पण आता सर्वसामान्यांचं सरकार आलं असं वाटतं,' हा त्यांनी सांगितलेला अनुभव खूप बोलका आहे, असेही त्यांनी मत व्यक्त केले आहे.

फक्त लोकांचे प्रश्न सोडवणे म्हणजे झालं असंही नाही तर एखाद्या सार्वजनिक कामासाठी अन्य काही पर्याय शोधत येईल का, यातून सरकारचे पैसे कसे वाचवता येतील आणि शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत अत्यंत प्रभावीपणे कशा पोचवता येतील, याचाही हे सगळे मंत्रीगण विचार करत असतात. त्यांची ही पॉझिटिव्ह कार्यपद्धती पाहताना अनुभवाच्या शिदोरीसोबतच समाधानाची 'स्वीट डिश'ही मिळते, असेही रोहित यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com