जनता मरायला लागली अन फिटनेस फंडे काय करता? अजित पवार मंत्र्यांवर बरसले

इथे महागाईनेजनता मरायला लागली अन फिटनेस फंडे काय करता ? भाजपच्या मंत्र्यांनी पेट्रोल - डिझेलची दरवाढ कमी करण्याचे चॅलेन्ज स्वीकारावे .
Ajit-Pawar-In-Pimpri.jpg
Ajit-Pawar-In-Pimpri.jpg

पिंपरीः "  इथे महागाईने जनता मरायला लागली अन फिटनेस फंडे काय करता ? भाजपच्या मंत्र्यांनी पेट्रोल - डिझेलची दरवाढ कमी करण्याचे चॅलेन्ज स्वीकारावे . महागाई कमी करावी . जनतेचे प्रश्न सोडवावेत . तुम्ही फिट असाल तर आधी जनतेची कामे करा . टीव्हीवर तुमचे व्यायाम आणि फिटनेस फंडे पाहण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले नाही , " अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांच्या फिटनेस चॅलेंजचा समाचार घेतला . 


पक्षाच्या आढावा बैठकीसाठी अजितदादा उद्योगनगरीत आले होते.त्यावेळी ते   बोलत होते. "साम,दाम,दंड,भेदचा अवलंब करा, पण झाले पाहिजे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारात सांगणे हा सत्तेचा गैरवापर आहे ."


सहा दिवसांपूर्वी आपल्या पक्षाच्या नगरसेवकानेही पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्याला काळे फासले,ते योग्य आहे का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले,"कुणाही पक्षाने वा त्यांच्या पदाधिकाऱ्याने कायदा हातात घेणे योग्य नाही. मात्र, काळे फासलेल्या प्रकरणात वारंवार सांगूनही त्या अधिकाऱ्याने रहिवाशांचा   विस्कळित  पाणीपुरवठा पूर्ववत सुरु केला नाही.म्हणून नगरसेवकाचा संताप झाला.त्यांच्या भावनेचा कडेलोट झाला. तरीही असे वागू नये, अशा मताचा मी आहे''.


आघाडी सरकारने लागू केलेला शास्तीकर युती सरकारने हटविल्याचे वक्तव्य पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी काल करीत श्रेय घेतले. त्याबद्दल अजितदादा म्हणाले, "एका विशिष्ट परिस्थितीत अभ्यासाअंती समितीच्या अहवालानंतर तो लागू करण्यात आला होता. पण त्यात मला राजकारण आणायचे नाही.फक्त तो प्रश्‍न पूर्ण सुटायला हवा''. 

एका टपरीचालकाच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांना तातडीने अटक करण्याची मागणी अजित पवार यांनी  केली.मात्र, राज्यकर्त्यांचे बगलबच्चे यात गुणले असल्याने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई होणार नाही, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.


सत्तेचे बळ मिळाल्याने काहीजण गुर्मी वागू लागले आहेत,असे सांगताना त्यांचा रोख शहराच्या कारभाऱ्याकडे होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com