pcmc standing committee meeting
pcmc standing committee meeting

पिंपरी-चिंचवडच्या स्थायी समितीत `अरे-तुरे`ची भाषा : भाजपविरोधात इतरांची एकजूट

..

पिंपरी : राज्यात सत्तेत एकत्र आलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवड महापालिकेतही एकजूट झाल्याने सत्ताधारी भाजपच्या रेटून कारभार करण्याला आता आळा बसला.

बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचा प्रत्यय आला. रेटून कारभार करण्यास भाजपला या दोन्ही पक्षांच्या दोन सदस्यांनी कडाडून विरोध केल्याने बैठकीत राडा झाला. `अरेतुरे`ची भाषा झाली. टक्केवारी बंदची मागणी करण्यात आली. त्यात एका भाजप सदस्यानेही शिवसेना,राष्ट्रवादी सदस्यांच्या हो ला हो दिल्याने ही सभा कुठलेच काम न होता स्थगित करण्याची नामुष्की भाजपवर आली.

प्रथेप्रमाणे स्थायीच्या साप्ताहिक बैठकी अगोदर समिती सदस्यांची अनौपचारिक प्रि-मिटींग होत असते. आज,मात्र ती न घेता थेट बैठक सुरु करण्यात आली. त्याला शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला. प्री मिटिंग घ्यायची नसेल,तर विषय बैठकीत वाचा. म्हणजे सदस्यांना ते कळतील. नुसतं मंजूर म्हणून कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

त्याला राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांचीही साथ मिळाली.तर,कायद्यात अशी तरतूद नसल्याचे सांगत अध्यक्ष विलास मडिगेरींनी बैठक चालविण्याचा प्रयत्न केला. त्यावर तसे कामकाज करायचे असेल, तर टक्केवारी बंद करा,अशी मागणी कलाटे बंधूंनी केली. दादागिरी चालू देणार नाही, असे ते म्हणाले. सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याची मागणीही त्यांनी केली. रिमोट कंट्रोलने बाहेरून सभेचे काम चालते का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यातून एकेरी उल्लेख झाला. परिणामी गोंधळ वाढला. दरम्यान, भाजपच्या एका सदस्यानेही विरोधकांच्या सूरात सूर मिसळला.सभा स्थगितीची मागणी केली.त्यामुळे दोन्ही बाजूंकडून कोंडी झालेल्या अध्यक्षांवर सभा तहकुबीची नामुष्की आली. आता ती पुढील बुधवारी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com