आर्थिक व इतर मदतीबरोबर पूरग्रस्तांसाठी; पिंपरीतून आता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा

पूरग्रस्तांना सव्वा कोटी रुपयांची मदत काल जाहीर केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज आपली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही (विशेष पथक)पूरग्रस्त सांगली जिल्ह्यासाठी रवाना केली. महापौर राहुल जाधव हे या पथकाबरोबर गेले आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनीही एक रेस्क्यू टीम पाठवली आहे.
आर्थिक व इतर मदतीबरोबर पूरग्रस्तांसाठी; पिंपरीतून आता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा

पिंपरी : पूरग्रस्तांना सव्वा कोटी रुपयांची मदत काल जाहीर केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज आपली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही (विशेष पथक)पूरग्रस्त सांगली जिल्ह्यासाठी रवाना केली. महापौर राहुल जाधव हे या पथकाबरोबर गेले आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनीही एक रेस्क्यू टीम पाठवली आहे.

पालिकेने कालच 3 जेटींग कम सक्शन मशीन व 10 कामगार पाठवले होते. त्यानंतर आज व्यवस्थापनासाठीची यंत्रणाही रवाना केली. त्यासोबत  60 मदतनीस कर्मचार्‍यांसह 6 मलजेट मशीन 1, वॉटर टॅन्कर, 1 फायर ब्रिगेडची गाडी तसेच जेवण व औषधांसह अत्यावश्यक साहित्यही पाठवण्यात आले आहे. यावेळी महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रविण लडकत, प्रशांत पाटील, दत्तात्रय रामगुडे, ओमप्रकाश बहिवाल व पूर बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी निघालेले प्रशिक्षित मदतनीस आदी उपस्थित होते. या विशेष टीम बरोबर महापौर असणार आहेत.

 शेखर ओव्हाळ युवा मंचने सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी  खाद्यपदार्थांचे जिन्नस, पाण्याच्या बॉट्लसह नऊ तरुणांची रेस्क्यू टीमही आष्टा गावी रवाना केली. त्यात धीरज शिंदे, सुशील मोगरे, सैफ सय्यद, योगेश गव्हाणे, राज पवार, प्रशांत जळकुटे, नंदू अहिरे, सिद्धाप्पा धोबी, शुभम जगदाळे यांचा समावेश आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शेखर ओव्हाळ म्हणाले कि पूरग्रस्त सध्या मोठ्या बिकट अवस्थेत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळण्याची गरज आहे. माणुसकीचा धर्म पाळायची हीच वेळ आहे. सगळेच आपले बंधू- भगिनी आहेत. या संकटकाळात आपण त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले पाहिजे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com