पिंपरी-चिंचवडला आता महिला महापौर

श्रीमंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर तथा शहराच्या पहिल्या नागरिक या आता महिला होणार आहेत. तसेच हे पद आता भोसरी विधानसभा मतदारसंघातून चिंचवडला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यापदी चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या समर्थक नगरसेविकेची निवड होईल,असा अंदाज आहे.तूर्त,त्यासाठी ज्येष्ठ नगरसेविका झामा बारणे यांचे नाव घेतले जात आहे.
पिंपरी-चिंचवडला आता महिला महापौर

पिंपरीः श्रीमंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर तथा शहराच्या पहिल्या नागरिक या आता महिला होणार आहेत. तसेच हे पद आता भोसरी विधानसभा मतदारसंघातून चिंचवडला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यापदी चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या समर्थक नगरसेविकेची निवड होईल, असा अंदाज आहे. तूर्त,त्यासाठी ज्येष्ठ नगरसेविका झामा बारणे यांचे नाव घेतले जात आहे.

आज मुंबईत काढण्यात आलेल्या राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरांच्या आरक्षण सोडतीत पिंपरी-चिंचवडसाठीचे महापौरपद हे ओपन महिलांसाठी निघाले. त्यामुळे अडीच वर्षानंतर शहराला पुन्हा महिला महापौर मिळणार आहे.गत टर्मला राष्ट्रवादीचे झालेले दोन्ही महापौर महिला होते. पहिल्या अडीच हे पद ओपन असल्याने भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी या महापौर झाल्या. नंतरच्या अडीच वर्षासाठी ते एसटीसाठी राखीव झाल्याने शकुंतला धराडे या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेविका महापौर झाल्या होत्या. अशा रितीने महापौरपद हे भोसरी व चिंचवडकडे आलटून पालटून राष्ट्रवादीच्या काळात राहिले. तोच कित्ता नंतर आलेल्या भाजप राजवटीत राहण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या अडीच वर्षासाठी महापौर हे भोसरीतले झाले. आता उर्वरित काळासाठी ते चिंचवडकडे जाण्याची शक्यता आहे.

२०१७ ला भाजप प्रथमच पालिकेत सत्तेत आली. महापौरपद पहिल्या अडीच वर्षासाठी ओबीसीसाठी राखीव होते. म्हणून तेथे ओबीसी नगरसेवक आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक नितीन काळजे यांची पहिल्या सव्वा वर्षासाठी वर्णी लागली. त्यानंतर महेशदादांचेच दुसरे दांडगे पाठीराखे राहूल जाधव महापौर झाले.हे दोघेही भोसरी विधानसभा मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यात पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपदी पहिली दोन वर्षे भोसरीकडे राहिलेले आहे. पहिल्यावर्षी सीमा सावळे, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षासाठीही भोसरीतीलच विलास मडिगेरी यांच्याकडे पालिकेच्या खजिन्याची चावी आहे. त्यामुळे आता महापौरपद हे चिंचवडकडे जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com