pcmc mayor | Sarkarnama

पराभूत महापौर विकणार इडली, वडापाव 

सरकारनामा न्यूजब्युरो 
शनिवार, 11 मार्च 2017

पिंपरी-चिंचवडच्या मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी महापौरपदाच्या कारकिर्दीबाबत समाधान व्यक्त केले. फक्त शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांवरसंरक्षक आवरण घालण्याचे काम राहिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पक्षाबरोबर आपणही पराजित झाल्याने पूर्वीसारखे बचत गटामार्फत इडली, वडापाव विक्री करण्याचा विचार असल्याचे त्या म्हणाल्या. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी महापौरपदाच्या कारकिर्दीबाबत समाधान व्यक्त केले. फक्त शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांवरसंरक्षक आवरण घालण्याचे काम राहिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पक्षाबरोबर आपणही पराजित झाल्याने पूर्वीसारखे बचत गटामार्फत इडली, वडापाव विक्री करण्याचा विचार असल्याचे त्या म्हणाल्या. 

रविवारी (ता.12) पदाची मुदत संपत असल्याने महापौरांनी आपल्या कारकिर्दीचा लेखाजोगा मांडला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पिंपळे गुरव भागात 2002 मध्ये धराडे या आपल्या बचत गटामार्फत इडली, वडापाव विकत होत्या. पती अद्याप पालिका सेवेत असून त्यामुळे त्यांना व संसाराला साथ देण्यासाठी इडली, वडापावचा व्यवसाय करण्यासाठी कसली लाज वाटणार नाही, असे त्या म्हणाल्या. संपूर्ण शहराला भेडसावणारा अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा प्रश्‍न सुटण्याच्या बेतात आला असून नव्या सत्ताधाऱ्यांच्या तो सुटेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख