पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणी : सत्ताधारी गप्प, राष्ट्रवादीचे मौन

आयुक्तांनी सर्वांना समान पाणी देण्यासाठी दोन महिने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मांडला.त्याला फक्त मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनीच विरोध केला.
pimpari chinchwad corporation alternate water supply
pimpari chinchwad corporation alternate water supply

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरूनही पिंपरी-चिंचवडला पुढील दोन महिने दिवसाआड पाणीपुरवठा उन्हाळ्यात नाही,तर ऐन हिवाळ्यात होणार आहे.

शहराचे कारभारी आणि पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या आदेशानुसार हा निर्णय पालिका प्रशासनाने आज घेतला. तो जाहीर करण्यापूर्वी गटनेत्यांच्या घेतलेल्या बैठकीत राष्ट्रवादी गप्प राहिली. फक्त मनसेने विरोध केला, मात्र,तो न जुमानता येत्या सोमवारपासून (ता.२७)शहरात दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता त्याविरोधात मनसेने आंदोलन करण्याचे ठरवले आहे.

सध्या शहरात पाणीकपात सुरुच होती. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जात होते. त्यात आता आणखी भर आज पडली.सायंकाळी साडेचार वाजता पालिका आय़ुक्त श्रावण हर्डीकर यांनी आणखी पाणीकपारातीची घोषणा केली.

त्यापूर्वी दुपारी तीन वाजता त्यांनी गटनेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे दोन नगरसेवक व एक नगरसेविका उपस्थित राहिल्याने एका गटनेत्याने आश्चर्य व्यक्त केले. गटनेत्यांच्या बैठकीत अतिक्रमण केलेल्या सत्ताधारी नगरसेवकाने आपल्या प्रभागात पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार मांडली.तर, या बैठकीत घुसखोरी केलेल्या नगरसेविकेने बेकायदेशीर नळजोड तोडण्याची मागणी केली.

आयुक्तांनी सर्वांना समान पाणी देण्यासाठी दोन महिने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मांडला.त्याला फक्त मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनीच विरोध केला. तर राष्ट्रवादीसह अपक्षांच्या गटनेते गप्प राहिले. सध्या शहरात अपुरे पाणी मिळत आहे. त्यामुळे ते पुरेशा प्रमाणात हवे असेल,तर दिवसाआड पाणी करावे लागेल,असे प्रशासनाने सुचविल्याने त्याला विरोध केला नाही, असे राष्ट्रवादीचे गटनेते नाना काटे यांनी सांगितले.

या निर्णयानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही व तक्रारी कायमच राहिल्या,तर विरोध करू,असे ते म्हणाले. दरम्यान,या निर्णयाला विरोध करण्यासाठी शहर मनसेची उद्या तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात काय  कसे आंदोलन करायचे हे ठऱविले जाणार असल्याचे चिखले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com