नगरसेविकेचा विनयभंग; ठार मारण्याचा प्रयत्न
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेचा विनयभंग करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शहरातील निगडी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. आपल्या अंगावर मोटार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तत्पूर्वी आपला विनयभंगही करण्यात आला असल्याची या नगरसेविकेची फिर्याद आहे.
शुक्रवारी ही घटना घडली. एक आरोपी परप्रांतीय आहे. दुसऱ्या संशयिताचे नाव अशोक काळे (वय ५७) असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी व फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे समजते. फिर्यादींनी काळेविरुद्ध पोलिस तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरून काळेच्या बॉडीगार्डने अंगावर मोटार घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे नगरसेविकेचे म्हणणे आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.