पिंपरीत नगरसेविकेचे पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन

पिंपरीत नगरसेविकेचे पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन

शहरात पुराचे पाणी शिरले असताना तसेच शहराला पाणीपुरवठा करणारे धरण भरूनही पुरेशा पाण्यासाठी आज पिंपरी-चिंचवडमध्ये शोले स्टाईल झाले. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेलाच ते करावे लागले. अडीच तास त्या आपल्या प्रभागातील (नेहरूनगर) पाण्याच्या टाकीवर त्यासाठी बसून होत्या.

पिंपरीः शहरात पुराचे पाणी शिरले असताना तसेच शहराला पाणीपुरवठा करणारे धरण भरूनही पुरेशा पाण्यासाठी आज पिंपरी-चिंचवडमध्ये शोले स्टाईल झाले. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेलाच ते करावे लागले. अडीच तास त्या आपल्या प्रभागातील (नेहरूनगर) पाण्याच्या टाकीवर त्यासाठी बसून होत्या.

भाजप व प्रशासनाला या आंदोलनातून घरचा आहेर मिळाल्याची चर्चा आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे दिवसाआड पाणी बंद होऊन दररोज पाणीपुरवठा नियमित झाल्यानंतर लगेच पाच दिवसांतच हे आंदोलन झाले.  

सुजाता पालांडे असे या नगरसेविकेचे नाव आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे शहरात जवळजवळ तीन महिने (८३ दिवस) दिवसाड पाणीपुरवठा होता. तेव्हा पुरेशा दाबाने पूर्णवेळ पाणी मिळत होते. रहिवाशांची एकही तक्रार आलेली नव्हती. मात्र, आठ ऑगस्टपासून दिवसा पाणी बंद होऊन नियमित दररोजचा पाणीपुरवठा सुरु झाला आणि शहरात पाणी टंचाईच्या तक्रारी येण्यास सुरवात झाली. कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी येत आहे. 

पालांडे यांच्या प्रभागात, तर ते खूप कमी दाबाने व कमी वेळ गेल्या पाच दिवसांपासून येत आहे.दुसरीकडे नदीच्या पूराचे पाणी शिरलेले काही रहिवासी अजून सावरलेले नाही. उशाशी असलेले धरण भरलेले आहे. दुसरीकडे दिवसाआड पाणी बंद होऊन ते नियमित दररोज सुरु झाले आहे. तरीही दररोज पाचशेच्यावर फोन पाणीटंचाईचे गेल्या पाच दिवसांपासून येत असल्यामुळे हैराण झालेल्या पालांडे या चक्क पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवरच जाऊन बसल्या. जोपर्यंत पाणी पुरेशा दाबाने व पूर्णवेळ मिळत नाही,तोपर्यंत खाली उतरणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांची समजूत घालण्यासाठी आलेल्या पाणी पुरवठा खात्याची त्यांची खरडपट्टीच काढली. 

शेवटी अडीच तासानंतर पुरेशा दाबाने पूर्णवेळ व पुरेसे पाण्याचे आश्वासन नाही,तर कार्यवाही झाल्यानंतर त्या अडीच तासानंतर त्यांनी आपले आंदोलन थांबवले. या कृत्रिम पाणीटंचाईचा संपूर्ण दोष त्यांनी प्रशासनाला दिला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com