pawar statement on farmer issue | Sarkarnama

"शेतकऱ्यांनो, जीव देऊ नका;  सरकारचं जगणं हराम करू' 

सरकारनामा न्यूजब्युरो
मंगळवार, 4 एप्रिल 2017

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या भाषणाने विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा पनवेलमध्ये समारोप झाला. पवार यांनी भाजप सरकारच्या विरोधात थेट हल्लाबोल करत शेतकऱ्यांनी जीव देऊ नका, असे आवाहन केले.

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या भाषणाने विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा पनवेलमध्ये समारोप झाला. पवार यांनी भाजप सरकारच्या विरोधात थेट हल्लाबोल करत शेतकऱ्यांनी जीव देऊ नका, असे आवाहन केले. तसेच यापुढे कर्जमाफीसाठी जीव देण्याऐवजी सरकारचं जगणं हराम करण्याचा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हे भाजपबाबत "सॉफ्ट' असल्याचा समज आहे. हा समज पवार यांच्या या भाषणामुळे दूर करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपुरात बोलताना "योग्य वेळी' कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा पुनरूच्चार केला. त्याचा समाचार राष्ट्रवादीचे दुसरे नेते अजित पवार यांनी घेतला. "उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफी दिली तर फडणवीस सरकार का देत नाही? तीन दिवसांत निर्णय घ्यावा; अन्याथा विधीमंडळाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा अजितदादांनी दिला आहे. शिवसेनेने तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कर्जमाफीबद्दल अभिनंदन केले. एकूणच या मुद्यावरून भाजपसमोरच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख