बालबुद्धीच्या विधानांकडे लक्ष देऊ नये : पवारांचा फडणवीसांना टोमणा

बालबुद्धीच्या विधानांकडे लक्ष देऊ नये : पवारांचा फडणवीसांना टोमणा

पुणे : बालकांनी काही विधानं केली तर ज्येष्ठांनी त्याकडे लक्ष देऊ नये. बालबुद्धीला शोभेल अशी विधानं ते करतायत, असे सांगत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावर फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. पवार यांची माघार म्हणजे भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीचा पहिला विजय असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. त्यावर पवार यांना आज विचारले असता त्यांनी नेहमीच्या शैलीत त्यावर उत्तर दिले. 

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल मते व्यक्त केली. काटोल विधानसभा पोटनिवडणूक आता लोकसभेच्या निवडणुकीसोबत होणार आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की फक्त तीन महिन्यांसाठी काटोल विधानसभेत निवडून आलेल्या व्यक्तीला काम करता येणार आहे.  तीन महिन्यांसाठी ही निवडणूक घेऊ नये अशी आमची मागणी होती. माझे सर्व पक्षांना आवाहन आहे. सगळ्यांनी एकत्र बसावे आणि अर्जच भरू नये. निवडणूक आयोगाने तरीही निवडणूक रद्द केली नाही तर सर्व पक्षांनी मिळून एकच सामाजिक क्षेत्रातील कुणाला तरी उमेदवारी द्यावी, अशी सूचना त्यांनी केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com