पवारांनी आणखी मानसिक धक्क्यांची तयारी करावी : चंद्रकांतदादा

पवारांनी आणखी मानसिक धक्क्यांची तयारी करावी : चंद्रकांतदादा

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणखी मानसिक धक्क्यांची तयारी करावी, असा इशारा देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते भाजपमध्ये येणार असल्याचे सूतोवाच केले.

सत्तेवर असताना शरद पवारांनी नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक यांना ईडीची भीती दाखवून राष्ट्रवादीमध्ये आणले का, असा सवाल करत भाजप दहशतीने पक्षप्रवेश घडवून आणत असल्याचा इन्सार केला. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात ते बोलत होते. त्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे पुढीलप्रमाणे

-मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही !निवडणुका कशाही घ्या, जिंकणार तर भाजपच !
-निवडणूक कशी घ्यायची हा अधिकार निवडणूक आयोगाचा
-ED आणि इन्कम टॅक्सच्या छाप्याची तयारी अनेक दिवस आधींपासून असते
-यापुढील धक्क्यांची मानसिक तयारी शरद पवारांनी करावी
-भाजपच्या एकट्याच्या जिवावर २०० जागा येणार असतील तरीही युती होणारच
-भाजप-शिवसेना युती तुटण्याची सुतराम शक्यता नाही
-गेल्या वेळेपेक्षा यंदा ५० लाख अधिकचे सदस्य नोंदवण्याचे उद्दिष्ट्य
-दीड कोटींपेक्षा जास्त सदस्य असणारा महाराष्ट्रात एकही पक्ष नाही
भाजममध्ये पक्षप्रवेश तावून-सुलाखून होत आहेत
-मंत्रिमंडळात एक विखे सोडले तर सर्व भाजपवालेच
-विखेंवर कोणतेही मोठे भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत
-त्यांना प्रशासकीय कामांचा मोठा अनुभव, कुटुंबाची पार्श्वभूमी सामाजिकच
-जवळपास ९० टक्के महामंडळाचे अध्यक्ष मूळचे भाजपाचेच
-काहीही झाले तरी शिवसेनेबरोबर युती होणारच, सत्तेचे समान वाटप होईल
- पुढच्या टप्प्यात काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येणार

-सर्व्हेमधून अंदाज येईल त्या नुसार उमेदवार बदलण्याचा निर्णय होईल

- विधानसभा निवडणुकीचे सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार, असे पक्षात ठरले आहे 

-वंचित विकास आघाडी लोकसभा निवडणुकीत लढली नसती तरी निकालात काही फरक पडला नसता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com