चर्चा `बारामती'ची, वाद महाजन-पवारांचा अन्‌ टीका मात्र भुजबळांवर!

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी बारामती मतदारसंघाविषयी वक्तव्य केले. त्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. हा वाद चर्चेत असतानांच काल अचानक जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचे कौतुक करीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात पत्रकबाजीचा प्रयत्न झाल्याने नाशिकच्या राजकीय पटलावर तो चर्चा अन्‌ विनोदाचा विषय ठरला आहे.
चर्चा `बारामती'ची, वाद महाजन-पवारांचा अन्‌ टीका मात्र भुजबळांवर!

नाशिक : जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी बारामती मतदारसंघाविषयी वक्तव्य केले. त्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. हा वाद चर्चेत असतानांच काल अचानक जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचे कौतुक करीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात पत्रकबाजीचा प्रयत्न झाल्याने नाशिकच्या राजकीय पटलावर तो चर्चा अन्‌ विनोदाचा विषय ठरला आहे. 

नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये वाक्‌युद्ध पेटले आहे. त्यात ज्येष्ठांनी उडी घेतली नसली तरीही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात संघर्ष उभा करण्यासाठी दोन्ही पक्षातील काही तरुण पुढे सरसावले. अचानक सुरु झालेल्या पत्रकांनी राजकीय कार्यकर्ते नेते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

पालकमंत्र्यांनी, पक्षाने जबाबदारी दिल्यास "बारामतीत' विजय मिळवून दाखवेन, असे वक्तव्य केले. या वक्तव्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी, "बारामतीत डिपॉझिट वाचवा अन्‌ कोटींचे बक्षीस मिळवा!' असे आव्हान दिले होते. या आव्हानाला आज भाजप विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष ऋषिकेश आहेर यांच्या नावाने प्रतिआव्हान देण्यात आले. त्यांच्या नावाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राष्ट्रवादीच्या पायाखालील वाळू सरकली असल्याची टीका केली. यामध्ये स्वयंघोषीत आरोग्यदूत अशी बिरुदावली लावणारे तुषार जगताप यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या वैद्यकीय शिबिरांची स्तुती करीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधातच आरक्षणाच्या विषयावरुन टिका करणारे पत्रक सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे. काल दिवसभर असंख्या ग्रुपवर ते फिरल्याने त्याला प्रतिसादाऐवजी टिकाच अधिक झाली. त्यामुळे चर्चा "बारामती' मतदारसंघाची, वाद महाजन आणि पवारांचा अन्‌ टिका मात्र भुजबळांवर. यात महत्वाचे पदाधिकारी अलिप्त आहेत. मात्र दुसऱ्या फळीतील असंख्य कार्यकर्ते तुटुन पडल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com