पवार- विखे वाद नवीन पिढीत येणार नाही, याची काळजी घेणार : रोहित पवार

नव्या पिढीतील नेते अधिक समजूतदारपणा दाखविणार?
पवार- विखे वाद नवीन पिढीत येणार नाही, याची काळजी घेणार : रोहित पवार

पुणे : पवार आणि विखे कुटुंबातील वाद नवीन पिढीत येणार याची आपण काळजी घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे नूतन आमदार रोहित पवार यांनी सांगितले. नगरच्या विकासासाठी एकत्र काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. एवढेच नाही तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी समन्वयाने विधानसभेत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साम वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे 

-मी कोणाची कॉपी करत नाही. राज्यात पुढील काळात वेगळा विकासाचा पॅटर्न पाहायला मिळेल.

-आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देऊन चर्चा केली. समन्वयाने विधानसभेत काम करणार. 

-पवार- विखे वाद नवीन पिढीत येणार नाही याची काळजी घेणार. एकत्र काम करणार. वाद कोठे ना कोठे थांबायला हवा. 

-राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या पैलवानांनी जास्त तेल लावलं. त्यामुळे जनतेच्या हातून निसटले आणि पडले. 

-राष्ट्रवादीत नवीन पैलवान आले आहेत. मात्र वस्ताद मार्गदर्शक पवारसाहेब आहेत. त्यामुळे काळजी नाही.

-कर्जतमध्ये विकास झाला नव्हता. रस्ते, जलयुक्त शिवार अभियान यात कामे झाली. मात्र त्यामध्ये अपहार झाला. 

-कर्जतमधील लोकांना बदल हवा होता. निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जोरदार पाऊस होता पावसामुळे साहेब येतील का, अशी शंका होती. पण साहेबांनी यायला होकार दिला

-राम शिंदे यांना अचानक भेटलो. त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. त्यांना बरोबर घेऊन विकास कसा करता, येईल ते पाहिलं

-अजितदादा घरात वेगळे असतात. त्यांनी मला सायकल शिकवली आहे. माझा आणि अजित पवार यांचा वाद झाला नाही. त्यांनी मला खूप समजून घेतले आहे. विधान सभेत त्यांचे मला खूप मार्गदर्शन मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com