pawar and bagade | Sarkarnama

साखर कारखाना काढतांना पवारांनी दिलेला सल्ला मोलाचा ठरला !

हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष
बुधवार, 12 डिसेंबर 2018

औरंगाबाद : साखर कारखाना उभारण्याचा विचार मनात सुरू असतांना एकदा मुंबई विमानतळावर माझी आणि शरद पवार साहेबांची भेट झाली. मी औरंगाबादला यायला निघालो होतो, तर ते दिल्लीला. काही मिनिटांच्या चर्चेत मी साखर कारखाना काढत असल्याचे त्यांना सांगितले आणि त्यांनी सखोल चौकशी सुरू केली. "कारखाना काढताय, पण त्याचे व्याज आणि विजेचा बोजा पडणार नाही याची काळजी घ्या' असा सल्ला त्यांनी मला दिला होता अशी आठवण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष अशा प्रदीर्घ राजकीय प्रवासात हरिभाऊ बागडे यांचा सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी संपर्क आला. माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत (एस) कॉंग्रेसपासून काम करण्याची संधी मिळाली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बागडे यांनी त्यांच्या सोबतच्या काही प्रसंगांना उजाळा दिला. हरिभाऊ बागडे म्हणाले, 1985 मध्ये भाजप आणि शरद पवार यांच्या (एस) कॉंग्रेसची युती होती. पाथ्रीकर आणि माझ्यासाठी पवारांनी त्यावेळी संयुक्त सभा घेतली होती. पाथ्रीकर पराभूत झाले आणि मी निवडून आलो. त्यानंतर आमच्या वेळोवेळी भेटी होत गेल्या. 

साखर कारखाना काढण्याची तयारी सुरू असतांना माझी आणि शरद पवारांची मुंबई विमानतळावर भेट झाली. ओघाने कारखान्याचा विषय निघाला. साखर कारखानदारीतील शरद पवारांचा अनुभव आणि ज्ञान सर्वानांच माहिती आहे. मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागात साखर कारखाना सुरू होतोय म्हटल्यावर त्यांनी मला त्यांच्या अनुभवाचे बोल सांगितले आणि सल्ला देखील दिला. कारखाना यशस्वीपणे चालवायचा असेल तर कारखान्याचे व्याज आणि विजेचा बोजा कमी झाला पाहिजे हे त्यांनी मला आर्वजून सांगितले. आमच्या कारखान्याला खाजगी वीज विकत घ्यावी लागत नाही, आम्हीच वीज निर्माण करतो. त्यामुळे भविष्यात अडचण आली नाही. पण मला सल्ला देण्यामागे त्यांची दूरदृष्टी आणि हेतू कसा मोलाचा होता हे दिसून आले. कारखान्या प्रमाणेच दूध उत्पादनात देखील शरद पवारांचे मोठे काम आहे. केंद्रात मंत्री असतांना पाच-सहा वर्षापुर्वी त्यांनी दुध उत्पादक सहकारी संघ आणि खाजगी कंपन्यांची संयुक्त बैठक बारामतीमध्ये बोलावली होती. तेव्हा मी आणि लातूर दूध संघाचे त्यावेळचे अध्यक्ष व्ही.बी. ठोंबरे आम्हाला पवार साहेबांनी त्यांच्या गाडीतून नेले होते. 

(शब्दांकनः जगदीश पानसरे) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख