अजितदादा तुरुंगात जातील का?, हे सांगायला मी ज्योतिषी नाही - चंद्रकांतदादा पाटील

  अजितदादा तुरुंगात जातील का?, हे सांगायला मी ज्योतिषी नाही - चंद्रकांतदादा पाटील

पिंपरी : जलसिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे तुरुंगात जातील, असे लोकसभा निवडणुकीपर्यंत सांगणाऱ्या भाजपने आता अचानक त्या मुद्यावरून यू टर्न घेतला आहे. पवार हे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी, तरी तुरुंगात जातील का अशी विचारणा केली असता ते सांगायला मी ज्योतिषी आहे का ? अशी उलट विचारणा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील दोन नंबरचे मंत्री (महसूल व सार्वजनिक 
बांधकाम) चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये केली. 

आगामी विधानसभेला अजित पवारांना पराभूत करणे हे आपले टार्गेट असल्याचे सांगून तशी व्यूहरचना सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान,यावेळी लोकसभेला बारामतीत थोडे कमी पडल्याची कबुली चंद्रकांतदादांनी दिली. मात्र, 2024 साठी,मात्र तेथे आतापासून कामाला लागलो असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातून बारामतीचा पुढील खासदार हा राष्ट्रवादीचा नसेल,असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. 

लोकसभेनंतर आता विधानसभेची व्यूहरचना भाजपचे राज्यातील चाणक्‍य असलेल्या चंद्रकांतदादांनी आता सुरू केली आहे. बारामतीत अजूनही पवारांचे प्राबल्य 
असल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यामुळे तेथील सहाही विधानसभा मतदारसंघाना बळ देणार आहे. त्यासाठी दर 15 दिवसांनी बारामतीला जाणार आहे.त्यातही कॉंग्रेसचे आमदार असलेले इंदापूर आणि भोर हे विधानसभा मतदारसंघ आता आपल्या निशाण्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणाऱ्या तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला पाटील सकाळी देहू येथे आले होते. त्यांनी तेथे पादुकापूजन केले. त्यानंतर पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच ते पिंपरी-चिंचवडमध्ये आले. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर ते बोलत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com