patil and nimbalkar | Sarkarnama

कैलास पाटील, मकरंद राजेनिंबाळकरांचा शेवटच्या दिवशी जोर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

उस्मानाबाद : नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी प्रचारात सक्रीय सहभाग नोंदवत शहरातील व्यापाऱ्यांची भेट घेत मतदान करण्याचे आवाहन केले. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट घेत या दोघांनी व्यापाऱ्यांसह मतदारांना आवाहन केले. उस्मानाबाद शहरात गणेश नगर ,मार्केट यार्ड,देशपांडे स्टॅंड, वडर गल्ली, शिवाजी चौक,समर्थ नगर येथील व्यापाऱ्यांच्या भेटी घेत प्रचार करण्यात आला. याप्रसंगी सर्व सेना नेत्यांमधील एकजुट दिसून आली. 

महायुतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार कैलास बाळासाहेब घाडगे यांच्या प्रचारासाठी, माजी जिल्हा प्रमुख भारत इंगळे,उपनगराध्यक्ष सुरज साळुंखे,नगर परिषदेचे गटनेते तथा नगरसेवक सोमनाथ गुरव, नगसेवक बाळासाहेब काकडे,युवा सेना शहरप्रमुख रवि वाघमारे, माजी शहरप्रमुख राजाभाऊ घोडके यांनी जोर लावला. शहरातील शिवसैनिक, बुथचे अध्यक्ष, यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली व डोअर टु डोअर प्रचार केल्यानेही शहरात वातावरण बदलण्यात सेनेला यश मिळत आहे. प्रचार रॅलीत महिलांनी उमेदवार कैलास पाटील यांचे औक्षण करून आशिर्वाद दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख