जयंत पाटील यांनी शिवसेनेची वकिली करू नये : चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीपासून सावध राहा. गृहखाते राष्ट्रवादीला देऊ नका, असा मित्रत्वाचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी दिला होता. त्यामुळे जयंत पाटील यांनी शिवसेनेची वकिली करण्याच्या फंदात पडू नये, आमचे मतभेद, भांडण शिवसेना व आम्ही पाहून घेऊ, त्यात जयंत पाटील यांनी पडू नये, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी शिवसेनेची वकिली करू नये : चंद्रकांत पाटील

पुणे : शिवसेनेबाबत बोलल्यानंतर त्याचे उत्तर जयंत पाटील का देत आहेत. जयंत पाटील यांनी शिवसेनेची वकिली घेतली आहे का, असा प्रश्‍न करून सत्तेमध्ये अधिक काळ राहण्यासाठी किती वकिली करावी याला काही हद्द आहे की नाही, या शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली. शिवसेनेबरोबर आम्ही सत्तेत नसलो तरी आमचे रक्त एक आहे. आमच्यात जे काही भांडण आहे ते आम्ही मिटवू याबाबत जयंत पाटील यांनी वकिली करण्याची गरज नाही, असे पाटील यांनी सांगितले. 

भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या संदर्भाने बोलताना भाजपाने शिवसेनेची फसवणूक केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, "" शिवसेनेला आम्ही फसवले की नाही हे पाटील यांनी सांगण्याची गरज नाही. त्यासाठी शिवसेना आहे. शिवसेनेला आम्ही फसवले असेल तर 25 -30 वर्षे शिवसेना आमच्याबरोबर कशी राहिली. भाजपाच्या पालखीचे भोई म्हणून शिवसेनेने काम केल्याचे म्हटले जाते. मात्र, 1995 ते 1999 या काळात भाजपाने शिवसेनेच्या पालखीचे भोई म्हणूनच काम केले आहे. या सरकारवर शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे नियंत्रण असल्याचे दिसत आहे. 

त्यामुळे राष्ट्रवादीपासून सावध राहा. गृहखाते राष्ट्रवादीला देऊ नका, असा मित्रत्वाचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी दिला होता. त्यामुळे जयंत पाटील यांनी शिवसेनेची वकिली करण्याच्या फंदात पडू नये, आमचे मतभेद, भांडण शिवसेना व आम्ही पाहून घेऊ, त्यात जयंत पाटील यांनी पडू नये, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com