प्रलंबित प्रश्‍नासाठी धरणग्रस्तांचे पाटणला खेकडे वाटप आंदोलन

 प्रलंबित प्रश्‍नासाठी धरणग्रस्तांचे पाटणला खेकडे वाटप आंदोलन

पाटण : धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न 20 वर्षे झाली तरी अद्याप प्रलंबितच आहेत. त्यामुळे शेतकरी, प्रकल्पग्रस्त देशोधडीला लागले आहेत. त्यांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पाटण कृषी बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी खेकडे वाटप आंदोलन केले. 

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रा. रवींद्र सोनावले, वामनराव साळुंखे, दादा कदम, रवींद देवकांत, तुकाराम भोसले, भरत शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, दादासाहेब सावंत, राजेंद्र सावंत, भरत सावंत, महिपती पवार, बाबासाहेब सावंत यांच्यासह धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. 

प्रारंभी विक्रमबाबा पाटणकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमवेत तहसीलदार रामहरी भोसले यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन धरणग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. तद्‌नंतर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना खेकडेवाटप आंदोलन केले. विक्रमबाबा पाटणकर म्हणाले, ""सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्‍याला धरणांचा तालुका अशी ओळख आहे. ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आपल्या जमिनी धरणे व प्रकल्पांसाठी दिल्या. त्यांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. आपल्या मागण्यांसाठी शासनाशी भांडावे लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे. 

प्रकल्पग्रस्तांना पाण्याची आवश्‍यकता असताना राज्यकर्ते आणि अधिकारी स्वतःच्या कारभारात व्यस्त आहे. त्यांना प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. निष्क्रिय प्रशासन व अधिकाऱ्यांच्या अनादरामुळे पाटण तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. आज शेतकऱ्यांना खेकड्यांचे वाटप केले आहे. शेतकऱ्यांनी आता खेकड्यांची शेती करून निर्माण झालेले जादा खेकडे सर्व धरणात सोडावेत. खेकड्यांमुळे रोकडा मिळतो व धरणेही फुटतील. धरणे फुटली की शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमिनी परत मिळतील. त्यांचा उदरनिर्वाह सुरू होईल यासाठी हे आंदोलन केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com