`त्या` पुरातील कामामुळे पतंगराव कदम यांची आजही लोक आठवण काढतात`

`त्या` पुरातील कामामुळे पतंगराव कदम यांची आजही लोक आठवण काढतात`

पलूस : कृष्णा नदीला सन 2005 पेक्षाही मोठा महापूर आला. यामध्ये माणसे, जनावरे दगावली. शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने जाहीर केलेल्या पेक्षा तीप्पटिने मदत पूरग्रस्तांना करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केली.

यावेळी ते म्हणाले, ``सन 2005 साली महपूराचे संकट आले होते. त्यावेळी स्व. पतंगराव कदम यांनी नागरिकांना सरसकट मदत शासनामार्फत केली होती. आजही लोक स्व. आमदार पतंगराव कदम यांंची आठवण काढतात.``

कदम हे अगदी पहिल्या दिवसापासून पलूस तालुक्यातील पूरग्रस्त गावांमध्ये तळ ठोकून आहेत. नागरिकांना महापूरातून बाहेर काढणेपासून ते त्यांची राहणे,जेवण , पाणी, जनावरांना चारा आदी व्यवस्था भारती विद्यापीठ आणि सोनहिरा साखर कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आली. तर अनेक सामाजिक व सहकारी संस्था मदतीसाठी धावून आल्या. अजूनही आमदार डॉ. कदम पूरग्रस्त भागात आहेत.

यावेळी आमदार डॉ. कदम म्हणाले, पलूस तालुक्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा व इतर जिल्ह्यात महापूराचे संकट आले. अगदी सुरुवाती पासून पूर परिस्थिती भागात  करित आहोत. अतिशय वाईट वेळ या नागरिकांवर आली आहे. ब्रम्हनाळ मध्ये तर 17 जणांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना आहे. पलूस तालुक्यात शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.पूर ओसरत आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झालेत.

त्यायाठिकाणी वीज, पाणी, धान्य , कपडे, भांडी असे आवश्यक साहित्य देणे गरजेचे आहे. आम्ही सर्व ती मदत करित आहोत. राज्यभरातून मदत येत आहे. तरिही महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्तांना भरघोस मदत करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना प्रत्येकी तीस हजार रुपये द्यावेत. महापूरात म्रुत्यूमुखी पडलेल्यांंच्या नातेवाईकांना अधिक मदततीची शासनाने मदत करावी. जनावरे, शेती , घरे यांचे पंचनामे करावेत. पूरग्रस्तांना सरसकट मदत करावी. अशी मागणी आमदार डॉ.कदम यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com