मतदानापूर्वीची रात्र वैऱ्याची कार्यकर्त्यांचा खडा पहारा 

मतदानापूर्वीची रात्र वैऱ्याची कार्यकर्त्यांचा खडा पहारा 

चिपळूण :  विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा तोफा थंडावल्यानंतर आता प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लावण्याचे नियोजन आघाडी आणि युतीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाले आहे. उघडपणे प्रचाराचा तोफा थंडावल्या असल्या तरी कंदील प्रचार सुरू आहे.


मतदानापूर्वीची रात्र सर्वात महत्वाची असल्याने कार्यकर्त्याकडून रात्रभर खडा पहारा देण्याचे नियोजन झाले असून प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली आणि भेटीगाठींवर वॉच ठेवण्याचे काम सुरु झाले आहे . 

चिपळूण मतदारसंघात एकूण 2 लाख 70 हजार मतदार आहेत. चिपळूण तालुक्‍यात 168 मतदान केंद्रावर संगमेश्‍वरात 168 केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान केंद्रावरील सर्व चोख व्यवस्था केली. आघाडीकडून शेखर निकम, तर युतीकडून सदानंद चव्हाण रिंगणात आहेत. शनिवारी सायंकाळी जाहीर प्रचार संपल्यानंतर रात्री छुप्या प्रचारास सुरवात झाली.

 शहरातील वॉर्डनिहाय एक गठ्ठा मते मिळण्यासाठी विविध क्‍लुपत्या लढवल्या जात होत्या. दोन्ही उमेदवार विजयाचे दावे करीत असले तरी दोघात बिग फाईट होणार हे निश्‍चित आहे. सोमवारी (ता. 21) मतदान होत असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी बूथचे नियोजन केले जात होते. कोण-कोण कार्यकर्ता असेल, त्याची यादी निश्‍चित करून त्यांच्यात ऊर्जा निर्माण होण्यासाठी रसद पुरवली जात आहे. परगावी असलेले अनेक मतदार आपल्या गावी परतले आहेत.

कार्यकर्त्यांसह उमेदवारांचे नातेवाईक दूरध्वनीवरून संबंधित मतदारांशी संवाद साधून सहकार्याचे आवाहन करीत होते. दोन्ही उमेदवारांचे कुटुंबीयांसह नातेवाईक विविध गावात तळ ठोकून होते. वाडीवाडीत घरच्या घरी खासगी बैठकांना जोर आला आहे. दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केले. त्यामुळे 24 ऑक्‍टोबरला लागणाऱ्या निकालात कोणाच्या कामाचे चीज होणार याकडे लक्ष लागले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com