खडसे- मुंडे यांची नाराजी पक्षाने दूर करावी : सुधीर मुनगंटीवार 

अनेक नेते निर्णय प्रक्रियेत असतात . त्यासाठी एकट्या फडणवीस यांना जबाबदार धरता येणार नाही -मुनगंटीवार
sudhir_munguntiwar_
sudhir_munguntiwar_

नागपूर: एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचे पक्षात मोठे योगदान आहे. ते नाराज असतील किंवा दुखावले असतील तर ते निश्‍चितच पक्षासाठी चांगले नाही. त्यांची नाराजी दूर करणे आवश्‍यक आहे. आपण या संदर्भात प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करू. याकरिता एकट्या देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरता येणार नाही, असे माजी अर्थमंत्री व ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


भाजपचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे वाढदिवसानिमित्त गुरुवारी गोपीनाथ गडावर घेण्यात आलेल्या मेळाव्यात खडेस यांनी पक्षाच्या नेतृत्वावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. माझा भरोसा नाही असे सांगून त्यांनी पक्ष सोडण्याचाही इशारा दिला. पंकजा मुंडे यांनीसुद्धा आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक पाडण्यात आला असल्याचा आरोप केला. 


या पाश्‍वभूमीवर मुनगंटीवार यांच्या संपर्क साधला असता काही गैरसमज निर्माण झाले असतील आणि त्यांची काही राजीनाराजी असेल तर ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. भाजप उभी करण्यात अनेकांचे योगदान आहे. त्यांचा विसर पडायला नको. ज्यांनी पक्ष उभारणीसाठी खस्ता खालल्या त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. पक्षाची काही चूक झाली असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न करू.


खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर थेट नाराजी दर्शवली आहे याकडे लक्ष वेधले असता मुनगंटीवार म्हणाले, त्यांचे नाराज होणे स्वाभाविक आहे. पराभवाचे विश्‍लेषण केले जाते. कोणी विरोधात काम केले असेल तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. 2014 विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची कोअर कमेटी स्थापन केली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे याचाही समावेश होता. सुरुवातीची साडेतीन वर्षे कोणाची नाराजी नव्हती. 


खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केले आहे. ते दुखावले असतील तर त्याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करू. प्रमुख नेत्यांकडून कार्यकर्त्यांना खूप अपेक्षा असतात. अनेक नेते निर्णय प्रक्रियेत असतात . त्यासाठी एकट्या फडणवीस यांना जबाबदार धरता येणार नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com