Party Has Changed so you also Change Ekanath Khadase Tells Party Workers | Sarkarnama

एकनाथ खडसे म्हणतात...'शनि' मागे लागलाय म्हणून शनिच्या दर्शनाला निघालोय 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पक्ष बदललाय, कार्यकर्त्यांनो तुम्हीही बदला, उद्योगधंदे करा असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री यांनी कार्यकर्त्यांना दिला

शिक्रापूर : पक्ष बदललाय, कार्यकर्त्यांनो तुम्हीही बदला. केवळ राजकारण करण्यापेक्षा आपापले उद्योगधंदेही वाढवा, असा मौलिक सल्ला माजी विरोधी पक्षनेते व भाजपात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नेते एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना शिक्रापूरात दिला.

एकनाथ खडसे आपल्या खाजगी दौ-याच्या निमित्ताने जळगावला जाताना नुकतेच शिक्रापूरात थांबले होते. भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र भुजबळ, उद्योजक शेखर दरवडे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी श्री खडसे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.

दरम्यान पूर्वी स्वर्गिय गोपीनाथ मुंडे तसेच मी स्वत: प्रदेशाध्यक्ष असतानाचा भाजपा तसेच त्यावेळी आम्ही प्रदेशाध्यक्ष असताना भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याची पध्दत पाहता कार्यकर्त्यांनी खुप पक्ष, राजकारण याबाबत चर्चा करण्यापेक्षा आपपाले व्यवसाय-धंदे विकसीत करण्याचा अनोखा सल्लाही श्री खडसे यांनी दिल्याची माहिती माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनिअनचे मानद अध्यक्ष श्रीकांत ढमढेरे, युवा कार्यकर्ते कल्पेश भुजबळ, हनुमंत भुजबळ, माऊली नरके, गोपाळ भुजबळ, ऋषीकेश फुलावरे आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून मी चर्चेत आहे, अनेक संकटे माझ्यावर येत आहेत. म्हणजेच माझ्या मागे शनि आहे. त्यामुळे मी आता शिक्रापूरातून जळगावला जाण्यापूर्वी शनिचे दर्शन घेवून जाणार असल्याचा मजेशीर विनोद करीत खडसे यांनी कार्यकर्त्यांचा निरोप घेतला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख