Parrikary Should tell about Rafel Deal says Prithviraj Chavan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मलबार हिल मतदार संघात भाजप चे मंगल प्रभात लोढा आघाडीवर
तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
नागपूर - दक्षिण पश्चिम मतदार संघ : पाचव्या फेरीत मुख्यमंत्री 11084 मतांनी पुढे
चंद्रकांत पाटील यांना सहाव्या फेरीअखेर ११ हजार, ५६५ मतांची आघाडी
मुक्ताईनगर सहाव्या फेरीत रोहिणी खडसे 2633 मतांनी पुढे
ऐरोली - गणेश नाईक 16308 मतांनी आघाडीवर
कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांची आघाडी कायम आठव्या फेरीअखेर 12915 मतांची आघाडी
बारामतीत सहाव्या फेरी अखेर अजित पवार 35578 मतांनी आघाडीवर
भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर महेश लांडगे १२ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

राफेल खरेदीबाबत काय घडले हे पर्रिकरांनी सांगावे : पृथ्वीराज चव्हाण

सुषेन जाधव  
रविवार, 16 डिसेंबर 2018

"राफेल विमानांची संख्या कमी करुन त्यांची किंमत तिप्पट केली जाते. ही प्रक्रिया अपारदर्शक आहे. यावर चर्चा झाली पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले. राफेल खरेदीबाबत नक्की काय घडले हे तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगावे असे आवाहनही त्यांनी केले.

औरंगाबाद : "राफेल विमानांची संख्या कमी करुन त्यांची किंमत तिप्पट केली जाते. ही प्रक्रिया अपारदर्शक आहे. यावर चर्चा झाली पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले. राफेल खरेदीबाबत नक्की काय घडले हे तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगावे असे आवाहनही त्यांनी केले.

रविवारी (ता.16) एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात 'राफेल विमान खरेदी : भ्रम आणि वास्तव' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. फ्रेंड्‌स ऑफ डेमोक्रसी आणि युथ फॉर डेमोक्रसी यांच्यातर्फे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, "जगातील लोकशाही देशांमध्ये शस्त्रास्त्रे खरेदी किंमत जाहीर केली जाते. मात्र, आपल्या देशात गोपनीयतेच्या नावाखाली राफेल खरेदीची किंमत लपविली जाते. संरक्षण खरेदी परिषदेला बाजूला सारुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण उपसमिती राफेलच्या किंमतीत वाढ करते. यास तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा विरोध होता."

नेमके खरेदी बाबत काय घडले हे पर्रीकर यांनी सांगण्यासाठी जनतेसमोर यायला हवे, असे सांगून ते म्हणाले की, युपीए सरकारने दहा वर्ष राफेल खरेदीला का विलंब केला? हा आरोप केला जातो; तो चुकीचा आहे. युपीएने 2008 मध्ये याबाबत प्रक्रिया सुरु केली होती. राफेल खरेदी हा आतापर्यंत जगातील संरक्षणविषयक सर्वात मोठा व्यवहार असल्याचेही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख