गावागावांत घुमताहेत तहसीलदार देवरेंच्या ध्वनिफिती - Parner Tehsildar Corona Awareness Clips Viral on Social Media | Politics Marathi News - Sarkarnama

गावागावांत घुमताहेत तहसीलदार देवरेंच्या ध्वनिफिती

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 मार्च 2020

संसर्गजन्य कोरोना विषाणुबद्दल लोकशिक्षण व जनजागृती करण्यासाठी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी तयार केलेल्या सात ध्वनिफिती पारनेर तालुका नव्हे, तर राज्यात सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. राळेगणसिध्दी येथे रोज सार्वजनिक जागेवरून लाऊडस्पीकरवर ध्वनिफितीद्वारे लोकजागृती केली जात आहे

राळेगणसिद्धी : संसर्गजन्य कोरोना विषाणुबद्दल लोकशिक्षण व जनजागृती करण्यासाठी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी तयार केलेल्या सात ध्वनिफिती पारनेर तालुका नव्हे, तर राज्यात सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. राळेगणसिध्दी येथे रोज सार्वजनिक जागेवरून लाऊडस्पीकरवर ध्वनिफितीद्वारे लोकजागृती केली जात आहे. 

कोरोना विषाणुमुळे जगभरातील बहुतेक देश संकटात सापडले आहेत. अमेरिका, चीन व युरोपातील अनेक देशांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात राज्यात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने लॉकडाऊन, जनता कर्फ्यु, संचारबंदी असे उपाय केले जात आहेत. 

तहसीलदार देवरे यांनीही  संसर्गजन्य कोरोना आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय आहेत, आजारावर आरोग्य विभागाच्या उपाययोजना काय आहेत, कोरोना टाळण्यासाठी काय पथ्ये पाळावीत, कर्फ्यु , लॉक डाउन, संचारबंदी म्हणजे काय याबाबत ध्वनिफिती तयार करून सोशल मीडियावर टाकल्या. त्याद्वारे अतिशय  लोकशिक्षण व जनजागृती घडत आहे.

हजारे यांनी केले कौतुक

राळेगणसिद्धी येथे दररोज संत यादवबाबा मंदिरातील लाऊडस्पीकरवर या ध्वनिफितीद्वारे जनजागृती केली जात आहे. तहसीलदार देवरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना मास्क व सॅनिटायझर भेट देत, कोरोना जनजागृतीची माहिती दिली. त्याचे हजारे यांनी कौतुक केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख