पारनेरच्या राजकारणात औटी, झावरे व लंकेंचे वादळ

विधानसभेच्या रणधुमाळीत पारनेर तालुक्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी जोरात सुरू आहेत. आगामी लढतीसाठी शिवसेनेकडून विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांची, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे निलेश लंके यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.
निलेश लंके, विजय औटी आणि सुजीत झावरे
निलेश लंके, विजय औटी आणि सुजीत झावरे

नगर - विधानसभेच्या रणधुमाळीत पारनेर तालुक्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी जोरात सुरू आहेत. आगामी लढतीसाठी शिवसेनेकडून विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांची, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे निलेश लंके यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. 

युती झाली नाही, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे भाजपमध्ये जाण्याची शक्यता असून, ते इच्छुक असल्याचे मानले जाते. त्यामुळे सध्या तरी औटी, झावरे व लंके या त्रिमूर्तींचे वादळ या मतदारसंघावर घोंगावते आहे.

पारनेर विधानसभा मतदारसंघात मागील दोन वर्षांपासून खलबते सुरू आहेत. बाजार समितीच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले. शिवसेनेतही औटी यांच्या विरोधात लंके यांनी दंड थोपटून ते राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे औटी यांच्यासमोर त्यांचाच पूर्वाश्रमीचा कार्यकर्ता असलेल्या लंके यांचे आव्हान उभे ठाकले. राष्ट्रवादीतील झावरे यांना मात्र लंके यांच्या रुपाने विरोधक तयार होऊन पक्षांतर्गत दोन गट अधिक सक्रीय झाले. या सर्व घडामोडीत झावेर राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असल्याचे मानले जाते.

विखेंचे बळ कोणाला?
दरम्यान, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे बळ कोणाला मिळते, यावर या मतदारसंघातील गणिते अवलंबून आहेत. भाजप-शिवसेनेची युती झाल्यास औटी यांना उमेदवारी मिळून साहजिकच विखे त्यांना मदत करतील. असे झाल्यास झावरे हेही भाजपमध्ये येऊन औटी यांची ताकद वाढवतील. मात्र युती झाली नाही, तर झावरे यांना पारनेरची उमेदवारी मिळू शकते. अशा स्थितीत डॉ. विखे मात्र झावरे यांना मदत करून विरोधकांना नाकी नऊ आणतील, अशी स्थिती तालुक्यात झाली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com