पारनेर बाजार समितीचे सर्व संचालक सुजीत झावरे यांच्या गोटात

 पारनेर बाजार समितीचे सर्व संचालक सुजीत झावरे यांच्या गोटात

नगर : पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दोन गटांतील वाद अधिक उफाळून आला आहे. आज बाजार समितीच्या नऊ संचालकांनी सभापती प्रशांत गायकवाड यांच्या मनमानीला कंटाळल्याचे कारण देत संचालक पदाचे राजीनामे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याकडे दिले आहेत. ते पुढे द्यायचे की नाही, याबाबत झावरे निर्णय घेणार असल्याने प्रशांत गायकवाड यांची नाडी झावरेंच्या हातात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून गायकवाड, झावरे यांनी राष्ट्रवादीकडे इच्छुक म्हणून मुलाखत दिली आहे. यांच्यासोबत नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेले निलेश लंके यांनीही मुलाखत देऊन उमेदवारी त्यांनाच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या घडामोडींच्या आधीच झावरे व गायकवाड गट पडून राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाली होती. बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा गायकवाड यांनी देऊन दुसऱ्या संचालकांना ही संधी देण्याचे ठरले होते, मात्र तसे झाले नाही. गायकवाड यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला नसल्याने झावरे गट नाराज झाला होता. हा वाद थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कोर्टात गेला होता. तेथे गायकवाड यांना अभय मिळाले होते. त्यामुळे गायकवाड यांचे सभापतीपद कायम राहिले.

त्यावर उपाय म्हणून आता झावरे यांनी इतर सर्वच संचालक फोडून आपल्या गटात ओढून घेतले आहे. दहा पैकी नऊ संचालकांनी राजीनामे दिल्याने गायकवाड अडचणीत सापडले आहेत. आता हे राजीनामे थेट जिल्हा उपनिबंधकांकडे सुपूर्द केले जातात, की अजित पवार यावर काही तोडगा काढतात, याबाबत चर्चा होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com