parliment and work | Sarkarnama

सदस्यांच्या उपस्थितीमध्ये लोकसभा आघाडीवर...

मंगेश वैशंपायन
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

......

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या पंधरवड्यातील 11 कामाच्या दिवसांत किती खासदारांनी नियमित हजेरी लावली याबाबतच्या अभ्यास पाहणीत लोकसभेने राज्यसभेवर आघाडी घेतली आहे. मात्र लोकसभेच्या 14 बदाह्हरांनी पहिल्या पंधरवड्यात सभागृहात साधे दर्शनही दिलेले नसल्याचे दिसून आलेले आहे. 
या काळात लोकसभेत सरासरी 82 टक्के तर राज्यसभेत 75 टक्के खासदारांनी नियमित हजेरी लावली. मात्र लोकसभा सचिवालयाने 28, 29 नोव्हेंबर व 2 डिसेबरची आकडेवारीच उपलब्ध केलेली नाही. संसदीय अभ्यास संस्थेने दोन्ही सभागृहांच्या अधिकृत माहितीनुसार राज्यसभेत पहिल्या 11 दिवसांत केवळ 39 टक्के खासदारांनी नियमित हजेरी लावली होती. 

झारखंडची निवडणूक तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे लोकसभेत 233 खासदारांनी नियमित हजेरी लावलेली दिसते. 14 खासदार मात्र अद्याप एकदाही सभागृहात दिसलेले नाहीत. मंत्री व दोन्ही पीठासीन अधिकारी वगळता लोकसभेत 498 व राज्यसभेत 233 खासदार आहेत. राज्यसभेत सात जागा रिक्त आहेत. मोदी सरकारमध्ये राज्यसभा सदस्यांचे वर्चस्व असून अर्थ, रेल्वे, पर्यावरण, महिला बालकल्याण, अल्पसंख्यांक आदी खाती सांभाळणारे तब्बल 13 मंत्री राज्यसभेच्या दाराने आलेले आहेत. राज्यसभेचे हे अडीचशेवे अधिवेशन असल्याने त्याला विशेष महत्व आहे. मात्र यातही उपस्तितीबद्दल अनेक खासदारांत उदासीनता दिसून येते. 
या पाहणीनुसार पहिल्या 15 दिवसांत प्रत्यक्ष कामकाजी दिवस 11 होते. यातील 19 नोव्हेंबरला लोकसभेत सर्वाधिक 89 टक्के खासदार उपस्थित होते तर राज्यसभेत 18 व 19 तारखांना सर्वाधिक 81 टक्के खासदार हजर होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख