parliament eledtion in december ? | Sarkarnama

डिसेंबर मध्ये लोकसभा निवडणुका ? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंबई : डिसेंबर महिन्यात लोकसभेच्या मुदतपुर्व निवडणुका होण्याची शक्‍यता आता अधिक दाट होऊ लागली आहे. राज्याच्या प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्येही मुदत पुर्व निवडणुकांची कुजबूज सुरु झाली असून सर्व राजकीय पक्षांचा बैठका सुरु आहेत.भाजपने मात्र गाजावाजा न करता निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 

मुंबई : डिसेंबर महिन्यात लोकसभेच्या मुदतपुर्व निवडणुका होण्याची शक्‍यता आता अधिक दाट होऊ लागली आहे. राज्याच्या प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्येही मुदत पुर्व निवडणुकांची कुजबूज सुरु झाली असून सर्व राजकीय पक्षांचा बैठका सुरु आहेत.भाजपने मात्र गाजावाजा न करता निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 

राजस्थान,मध्यप्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभां बरोबर लोकसभेच्या मुदतपुर्व निवडणुका होण्याची शक्‍यता गल्ली पासून दिल्ली पर्यंत वर्तवली जात होता. या चर्चेत सनदी आणि बड्या पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग नसायचा. मात्र,आता हे अधिकारीही मुदत पुर्व निवडणुकीची चर्चा करु लागले आहे. गेल्या एका दिड महिन्यात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत.खासकरुन निवडणुकांपुर्वी अशा प्रकारच्या घाऊक बदल्या होतात.त्यामुळे बडे अधिकारीही आता मुदतपुर्व निवडणुकांची चर्चा करु लागले आहेत. 

राजकीय पक्षांनाही मुदतपुर्व निवडणुकीची शक्‍यता वाटत असल्याने तेही तयारीला लागले आहेत.कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यात बैठका होऊ लागल्या आहेत.तर,शिवसेनेनेही निवडणुक एकट्या लढण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे.राज्यातील तीन प्रमुख पक्षांच्या बैठकांची जोरदार चर्चा सुरु आहे.तर,भाजप मध्ये यापूनच लांब राहीली आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम ठरवून दिला आहे.त्या कार्यक्रमानुसार बूध निहाय काम भाजपने सुरुही केले आहे.त्या पार्श्‍वभुमीवर या आठवड्यात मुंबईतील प्रचार प्रमुखांची बैठक होण्याची शक्‍यता आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक होणार होती. मात्र, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळेही बैठक रद्द करण्यात आली होती.ही बैठक झाल्यावर राज्य त्यानंतर शहर अशा स्तरावर बैठक होणार असल्याचे समजते.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख