पटोलेंनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे परिणय फुके न्यायालयात

....
parinay fuke-nana patole
parinay fuke-nana patole

नागपूर  : साकोली पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची विनंती विधान परिषद सदस्य, माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज सादर करीत केली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना केलेली मारहाण व अवैध सापडलेल्या रकमेप्रकरणी त्यांच्यावर साकोली पोलिस ठाण्यामध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज्यात ऑक्‍टोबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. साकोली मतदारसंघात परिणय फुके हे भाजपतर्फे तर काँग्रेसतर्फे विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले रिंगणात होते. या वेळी फुके यांचे लहान बंधू नितीन फुके हे मतदारांना पैसे वाटत होते. त्यामुळे, नाना पटोले यांचे पुतणे जितेंद्र पटोले यांनी त्यांना हटकले.

यावरून दोन्ही गटांत वाद झाला. त्यात जितेंद्र पटोले व त्यांचा एक सहकारी गंभीर जखमी झाले. तसेच, पोलिसांनी नितीन फुके यांच्या ताब्यातून १७ लाख ७४ हजार रुपये एवढी रक्कम जप्त केली. यानंतर, पोलिसांनी आमदार परिणय फुके यांच्यासह एकूण ३० जणांवर साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार फुके यांनी नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला.

या वेळी आमदार परिणय फुके यांनी आपला राजकीय दबाव वापरून पोलिसांकडून कमी दर्जाचे कलम लावून घेतले. या प्रकरणात आरोपींवर ३०७ चा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, असा युक्तिवाद फिर्यादीकडून करण्यात आला.

त्यामुळे आमदार फुके यांना कोणताही दिलासा देऊ नये, अशी विनंतीही करण्यात आली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने साकोली पोलिसांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. आमदार फुके यांच्यातर्फे रोहन छाबरा, फिर्यादी तीर्थानंद पटोले यांच्यातर्फे  सतीश उके आणि सरकारतर्फे  स्वाती कोल्हे यांनी बाजू मांडली. या प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com