बाळासाहेब देसाई यांचे नातू परिक्षित थोरात भाजपमध्ये - parikshit thorat joins bjp | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेब देसाई यांचे नातू परिक्षित थोरात भाजपमध्ये

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री व विधानसभेचे माजी सभापती (कै.) बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे भाचे परिक्षित थोरात यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला.

थोरात हे पुण्यात कार्यरत असून राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे माजी उपाध्यक्ष आणि मनसेचे माजी समन्वयक आहेत. नाशिक येथील मराठा विद्या समाज प्रसारक संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे ते नातू आहेत. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी पुण्यातील क्रांतीवीर संघटनेचे संजय पचंगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पचंगे यांच्या प्रवेशामुळे शिरूरमध्ये भाजपला फायदा होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख