नेते गोळा करण्याच्या नादात परिचारकांनी मतदार गमावले...

नेते गोळा करण्याच्या नादात परिचारकांनी मतदार गमावले...

मंगळवेढा : केंद्रात व राज्यात सत्ता असताना विधानसभेच्या निवडणुकीत नेते गोळा करण्याच्या नादात मतदार दुरावल्याने भाजपाला पंढरपूर मतदारसंघात हार पत्करावी लावली. मंगळवेढ्यातील रखडलेल्या प्रश्नांमध्ये लक्ष घातले तर भविष्यात भाजपाला देखील `अच्छे दिन` येऊ शकतात.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान  मंगळवेढा तालुक्यात 1लाख 24 हजार 318 इतके  झाले. त्यात आमदार भारत भालके 37795 तर सुधाकर परिचारकांनाा  30039 तर अपक्ष समाधान आवताडे 43657 मते मिळाली. निवडणुकीत भालके यांना पराभूत करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी मोठी कंबर कसली. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, चित्रा वाघसह अभिनेत्रीला पाचारण केले.

शहरातील राहुल शहा यांचा गट व माजी पालकमंत्री मोहिते-पाटील यांच्या गटाबरोबर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे गट, भालकेचे समर्थक असलेले पक्षनेते नितीन पाटील, तानाजी खरात, सुरेश ढोणे, नंदकुमार पवार आदीसह शहरातील व तालुक्यातील अनेकांना परिचारकानी जवळ करून आपला गट मजबूत केला .परंतु या मजबूत गटाचे रुपांतर मतांत करण्यात ते कमी पडले. निवडणुकी दरम्यान अनेक नेत्यांना जवळ केले. त्यापैकी तानाजी खरात  व नितीन पाटील,शिवानंद पाटील, वगळता  बहुत समर्थकांच्या  गावात किंवा वार्डात  देखील अपेक्षित मताधिक्य घेता आले नाही. ही बाब देखील चिंताजनक आहे. मोठ्या सहकारी संस्थेवर संचालकपदी संधी दिली. त्यांची गावे देखील मागे राहिली.

आमदार परिचारकांच्या जवळ बसून मताधिक्य देण्याचा दावा करणारे यात उघडे पडले. गत विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक पराभूत झाल्यानंतर तीन वर्षात मतदारसंघात सक्रिय सहभाग घेतला नसल्याचा परिणाम त्यांना सोसावा लागला. गतं निवडणुकीप्रमाणे  यंदाच्या निवडणुकीत नदीकाठच्या गावांत यंदा मतदान झाले नाही. भाजपातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून मंगळवेढ्यात संपर्क वाढवलेल्या शैला गोडसे यांनी बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी मागे घेतली. पण प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही.

प्रचारामध्ये सुधाकरपंत परिचारक हे उमेदवार असताना प्रशांत परिचारक उमेदवार समजून आरोप-प्रत्यारोप करत करण्यात आले परंतु सत्ताधारी आमदार असलेल्या प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील रस्त्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देताना केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ ग्रामीण जनतेला मिळाला हे देखील त्यांनी पटवून दिले. परंतु शहरातील क्षेत्र विकास आराखडा, बसवेश्वर स्मारक, व मंगळवेढा उपसा सिंचन योजना यासह कर्जमाफी,पिक विमा हे मुद्दे विरोधकांनी प्रचारामध्ये प्रभावीपणे मांडले. हा मुद्दा परिचारक खोडू शकले नाहीत. परंतु नेते गोळा करून आपला गट मजबूत करण्याच्या नादात मतदार मात्र हातातून निसटत चालल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे राज्यात सत्ता येऊनही या मतदारसंघाची अवस्था `गड आला पण सिंह गेला` अशी अवस्था झाली आहे. प्रशांत परिचारक यांच्या विधान परिषदेचा सदस्यत्वाचा कालावधी अजून शिल्लक आहे. अशा परिस्थितीत मंगळवेढ्यातल्या रखडलेल्या प्रश्नाकडे लक्ष घालून स्वतः जनतेला सोबत घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com