परभणीत राष्ट्रवादीचा झेंडा, वरपुडकरांना धक्का

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत पुन्हा सत्तेसाठी दावेदारी केली आहे. मागील दहा वर्षापासून हा पक्ष जिल्हा परिषदेच्या सत्तेत आहे. यंदाही हाच पक्ष मोठा राहील असा अंदाज वर्तविला जात होता. आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या सभा, प्रासंगिक कराराची चर्चा, लक्ष्मीअस्त्राचा धुमाकूळ यामुळे निवडणुकीचे विविध रंग पहायला मिळाले. प्रस्थापितांच्या नातलगांच्या उमेदवारीमुळे निष्ठावंतावर झालेला अन्याय आणि त्यातून उभे राहिलेले बंडखोर यामुळे निवडणूक चुरशीची झाली होती. एकाच भावकीतील उमेदवारांमध्ये तिसऱ्याचा झालेला लाभ अशीही काही उदाहरणे आहेत.
परभणीत राष्ट्रवादीचा झेंडा, वरपुडकरांना धक्का

परभणी ः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वच पक्षांना धोबीपछाड देत 24 जागांवर विजय मिळविला आहे. बहुमतासाठी केवळ चार जागांची गरज असून कॉंग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र राष्ट्रवादीच्या गोटात भाजप किंवा अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात कॉंग्रेस भुईसपाट झाली असून त्यांना केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे तर शिवसेनेची दोन जागांनी वाढ झाली आहे. प्रस्थापितांना फारसे हादरे बसले नसले तरी अनेक ठिकाणी नवख्यांनी बाजी मारली आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसच्या प्रासंगिक कराराचा फटका कॉंग्रेसलाच बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत पुन्हा सत्तेसाठी दावेदारी केली आहे. मागील दहा वर्षापासून हा पक्ष जिल्हा परिषदेच्या सत्तेत आहे. यंदाही हाच पक्ष मोठा राहील असा अंदाज वर्तविला जात होता. आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या सभा, प्रासंगिक कराराची चर्चा, लक्ष्मीअस्त्राचा धुमाकूळ यामुळे निवडणुकीचे विविध रंग पहायला मिळाले. प्रस्थापितांच्या नातलगांच्या उमेदवारीमुळे निष्ठावंतावर झालेला अन्याय आणि त्यातून उभे राहिलेले बंडखोर यामुळे निवडणूक चुरशीची झाली होती. एकाच भावकीतील उमेदवारांमध्ये तिसऱ्याचा झालेला लाभ अशीही काही उदाहरणे आहेत. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक 24 जागा मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला तर शिवसेना 13 जागा मिळवीत दुसऱ्या स्थानी राहिली. त्यापाठोपाठ कॉंग्रेसला सहा जागा तर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच पाच जागा मिळविल्या आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाने चांगली कामगिरी केली असून तीन जागांवर विजय मिळविला आहे. घनदाट मित्रमंडळाचा एकच उमेदवार विजयी झाला असून दोन अपक्षही विजयी झाले आहेत. 
राष्ट्रवादी - भाजप एकत्र येण्याची शक्‍यता 
जिल्हा परिषदेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्थानिक नेत्यात निकालापुर्वीच करार झाल्याची चर्चा आहे. या दोन्ही पक्षांनी अपेक्षेप्रमाणे यश मिळविल्याने सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीला अनपेक्षित असे यश जिंतूर तालुक्‍याने मिळवून दिले आहे. दहा पैकी नऊ जागा राष्ट्रवादीच्या पदरात तालुक्‍याने टाकून मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत याच तालुक्‍याला प्राधान्य मिळणार आहे. 
प्रासंगिक कराराचा फटका 
शिवसेना आणि कॉंग्रेसच्या प्रासंगिक कराराची चर्चा जोरदार झाली होती. राष्ट्रवादी आणि भाजपकडून याच मुद्याला प्रचारात लक्ष केले जात होते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याच करारावरुन शिवसेना आणि कॉंग्रेसवर टीका केली होती. या करारातून कॉंग्रेसपेक्षा शिवसेनेलाच लाभ झाल्याने कॉंग्रेसला काय मिळाले यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. 
बोर्डीकर-वरपुडकरांना धक्का 
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकरांच्या नेतृत्वात लढविलेल्या या निवडणुकीत मतदारांनी त्यांना मोठा धक्का दिला आहे. मागील निवडणुकीत कॉंग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या. त्यात जिंतूर तालुक्‍यात चार तर मानवत, परभणी, गंगाखेड, पालम मध्ये प्रत्येकी एक जागा होती. यंदा केवळ परभणी तालुक्‍यात तीन आणि मानवत, गंगाखेड, पूर्णा तालुक्‍यात प्रत्येकी एक जागा मिळाली असून जिंतूरमध्ये एकही जागा मिळाला नसल्याने माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.ॉ 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com