parbhani zp | Sarkarnama

परभणी महापालिकेसाठी लोणीकरांनी रणशिंग फुंकले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 मार्च 2017

परभणी ः गेल्या तीस वर्षात आपण शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला बघितले. जिल्हा भंगार झाला आहे, सर्वांनी मिळून लुटण्याचेच काम केले आहे. आता पारदर्शी कारभारासाठी व शहरासह जिल्ह्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन करीत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्यांचे संपर्क मंत्री बबनराव लोणीकर यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. 

येथील अग्रवाल मंगल कार्यालयात शनिवारी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप परभणी महानगरतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे नेते भाऊराव देशमुख, डॉ. भागवत कराड, भाई ज्ञानोबा मुंढे, ऍड. विजय गव्हाणे, अभय चाटे, आनंद भरोसे, दिलीप ठाकूर, अनिल मुदगलकर, मोकिंद खिल्लारे, मोहन कुलकर्णी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. लोणीकर म्हणाले, बेईमानांना आता मतदान करू नका. मत मागण्यासाठी आले तर एक लिटर रक्त देतो पण मतदान नाही, असे सांगा. वर्षांपासून सत्ता भोगणारे शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीने शहरासह जिल्ह्याला भंगार करण्याचे काम केले. परभणीचे पालकमंत्री तर दुसरे झेंडा मंत्री आहेत. त्यांचे, खासदार व आमदारांचे लक्ष नाही. महापालिकेत तर प्रचंड भ्रष्टाचार आहे. पाणीपुरवठा, शौचालयाचे पैसे देखील खाल्ले असे म्हणून त्यांनी याची चौकशी लावून संबंधितांना हर्सूलच्या जेलमध्ये टाकू, असा हल्लाबोल केला. 
शहराला फिल्टरचे पाणी देऊ 
पाणीपुरवठा योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला. परंतु लोकांचे हित व माझी जन्मभूमी-कर्मभूमी म्हणून निधी दिला. अमृत योजनेतून शंभर कोटी दिले. देशात सर्वत्र परिवर्तनाची लाट आहे. येथेही परिवर्तन होईलच, तेव्हा शहराला फिल्टरचे पाणी देऊ. भूमिगत गटारे, उद्याने विकसित करू असे आश्वासन दिले. महापालिका निवडणुकीत शहरात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करणार. सर्व समाजाला बरोबर घेणार. कॉंग्रेस, राष्ट्रवादीने दलित, मुस्लिमांचा केवळ वापर केला. आमच्यापासून दूर ठेवले परंतु आता त्यांना समजले आहे. त्यांच्या मदतीने क्रांती घडवू, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू व तीन टोळ्यांना हद्दपार करू असेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख