परभणीत शिवसेनेचे डॉ. राहूल पाटील 80 हजार मतांनी विजयी 

Rahul_Patil.
Rahul_Patil.

परभणी  ः शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील हे परभणी विधानसभा मतदार संघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. या मतदार संघात शिवसेनेने 1990 पासून सलग सातव्या वेळेस भगवा झेंडा फडकावला आहे. प्रथमच शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील हे विक्रमी 80 हजार 341 मताधिक्याने विजय प्राप्त करून निवडणूक एकतर्फीच केली. त्यांचे सर्व 14 प्रतिस्पर्धी एकूण केवळ 86 हजार 961 मते घेऊ शकले.

अगदी पहिल्या फेरी पासून शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. राहुल पाटील यांनी घेतलेल्या आघाडीच्या आसपासही एकही उमेदवार पोहचू शकला नाही व प्रत्येक फेरीगणिक ही आघाडी उत्तरोत्तर वाढतच गेली. अखेरच्या 22 व्या फेरीअखेर डॉ. पाटील यांनी एक लाख तीन हजार पाच मते म्हणजे निम्म्यापेक्षाही अधिक (54.22 टक्के) मते प्राप्त करून दणदणित विजय प्राप्त केला.

त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी राहिले ते एमआयएमचे उमेदवार अलीखान मोईन खान. त्यांनी 22 हजार 64 मते प्राप्त केली. डॉ. पाटील यांनी 80 हजार 341 मतांनी विजय प्राप्त केला. या निवडणूकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख हे पाचव्या स्थानावर फेकल्या गेले. त्यांना फक्त 15 हजार 368 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद गौस झेन यांना 22 हजार 620 मते मिळाली. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. तर कॉंग्रेस बंडखोर व मोठी हवा निर्माण केलेले अपक्ष उमेदवार सुरेश नागरे चौथ्या स्थानी राहिले. त्यांना फक्त 18 हजार 247 मते मिळाले.

अन्य उमेदवारांमध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रतिभा मेश्राम यांना 829 मते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन पाटील यांना एक हजार 905 मते, प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलींग बोधने यांना 553 मते, बहुजन मुक्ती पार्टीचे विनोदअण्णा भोसले यांना 706 मते तर अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या अॅड. अफजल बेग यांना 374, अब्दुल जमीर यांना 257, शेख अली शेख नबी यांना 243, गोविंद देशमुख यांना 461, शमीम खान नसिर खान यांना 464, तर संगीता जगाडे यांना 701 मते मिळाली तर नोटाला एक हजार 568 मतदारांनी पसंती दिली.


.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com