खासदार संजय जाधव जेव्हा सोवळे नेसून येतात.....

परभणी शहरातील एका मंगल कार्यालयात उत्तरादी मठाधीश सत्यात्मतीर्थ महाराजांचे आगन झाले आहे.महाराजांचे दर्शन सोवळ्यात असल्याने खासदार संजय जाधव यांनी सोवळ्यात जावून श्री सत्यात्मतीर्थ महाराजांचे दर्शन घेतले
Parbhani MP Sanjay Jadhav Attair Became Talk of The Town
Parbhani MP Sanjay Jadhav Attair Became Talk of The Town

परभणी : राजकारणी मंडळी सहसा आपल्याला पांढऱ्या शुभ्र पोखात दिसतात. अलीकडच्या काळात खादीच्या जाकेटकडे या मंडळीचा कल वाढला आहे. परंतु,  कधी कोण्या मोठ्या राजकारणाऱ्याला चक्क सोवळे घालून देव दर्शनासाठी जातांना कुणी पाहिले आहे का? परंतु, याला परभणीचे खासदार अपवाद ठरले आहेत. परभणी येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या महाराजांच्या दर्शनासाठी खासदार संजय जाधव यांनी चक्क सोवळे नेसून व अंगावर शाल घेवून कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. खासदारांचा हा पोशाख उपस्थित सर्वांनाच आश्चर्यात टाकणारा ठरला.

परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे वारकरी संप्रदायातील आहेत. त्यामुळे राजकारणातील व्यग्र जीवनातही ते हरीनामाच गजर सोडत नाहीत. पांडुरंगाची नित्योपासना करूनच ते घराबाहेर पडतात. खासदार संजय जाधव यांच्या गळ्यात तुळशीची माळ व कपाळावर अबीरबुक्का हा नेहमीच असतो. राजकारणात राहूनही त्यांची विठ्ठलभक्ती सर्वश्रुत आहे. आता खासदार संजय जाधव यांचे नवे रुप ही परभणीकरांना गुरुवारी (दि. 19) पाहवयास मिळाले. 

परभणी शहरातील एका मंगल कार्यालयात उत्तरादी मठाधीश सत्यात्मतीर्थ महाराजांचे आगन झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत सलग दोन दिवस कार्यक्रम आहे. या महाराजांच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी परभणीतील नागरीकांनी रांगा लावल्या होत्या. त्यात परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील आले होते.

परंतु, महाराजांचे दर्शन सोवळ्यात असल्याने खासदार संजय जाधव यांनी सोवळ्यात जावून श्री सत्यात्मतीर्थ महाराजांचे दर्शन घेतले. परभणी जिल्हयाच्या राजकारणातील सर्वात मोठा व्यक्ती अत्यंत साधेपणाने व धार्मिक नियम पाळून दर्शन घेत असल्याने याची चर्चा होत होती. खासदारांनीही स्वतःच्या पदाचा बडेजाव न दाखविता तेथील नियमाप्रमाणेच जावून दर्शन घेतले. खासदारांच्या या पोषाखाची मात्र परभणीभर चर्चा होत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com