परभणी : जनरेशन नेक्स्ट ,वरपुडकर - बोर्डीकर  समाजकारणातून राजकारणाकडे  - Parbhani Generation Next Bordikar & Warpudkar | Politics Marathi News - Sarkarnama

परभणी : जनरेशन नेक्स्ट ,वरपुडकर - बोर्डीकर  समाजकारणातून राजकारणाकडे 

गणेश पांडे 
बुधवार, 25 एप्रिल 2018

परभणीचे राजकारण सातत्याने वरपुडकर - बोर्डीकरांच्या नावाभोवतीच फिरत राहिले आहे. याच दोन राजकीय घराण्यातील दोघीजणी राजकारणात सक्रीय आहेत. यात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना साकोरे - बोर्डीकर व माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या सूनबाई प्रेरणा वरपुडकर. 

परभणी : जिल्ह्याच्या राजकारणात वरपुडकर - बोर्डीकर हे दोन मात्तबर नेते म्हणून राज्यभरात ओळखले जातात. परभणीचे राजकारण सातत्याने वरपुडकर - बोर्डीकरांच्या नावाभोवतीच फिरत राहिले आहे. याच दोन राजकीय घराण्यातील दोघीजणी राजकारणात सक्रीय आहेत. यात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना साकोरे - बोर्डीकर व माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या सूनबाई प्रेरणा वरपुडकर. 

या दोघींनी सामाजिक कामाच्या माध्यमातून राजकारणाची किनार पकडली आहे.माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामाजिक काम सुरु केले आहे. त्या उच्च शिक्षित आहेत. पती भारतीय पोलिस सेवेत अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरापासून त्या मतदारसंघातील लोकांच्या सातत्याने संपर्कात आहेत. सकाळी सात ते रात्री दहापर्यंत लोकांच्या समस्या जाणून घेणे त्यांची कामांसाठी मदत करणे असा दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो.

शिक्षण, युवकांसाठी रोजगार, महिला सक्षमीकरण या तीन गोष्टीवर त्यांचा भर दिसून येतो आहे. आजपर्यंत त्यांनी मतदार संघातील १२५ गावात मुक्काम करून लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचे काम सध्या त्या करीत आहेत. एक उत्तम गृहिणी व एक सक्षम राजकारण्याचे गुण मेघना साकोरे यांच्यात पहावयास मिळतात.

प्रेरणा वरपुडकर या सध्या सामाजिक कार्यात गुंतलेल्या आहेत. पाथरी विधानसभा मतदार संघात प्रेरणा सध्या त्या काम करत आहेत. दररोज सकाळी मतदारसंघातील गावात जावून गावकऱ्यांशी संपर्क वाढविणे, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महिलांच्या समस्या जाणून घेणे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यत प्रेरणा वरपुडकर गावा - गावात फिरताना दिसून येत आहेत.

उच्चशिक्षित व घरात राजकीय परंपरा असल्याने माणसांना जमविण्याचा व त्यांना आपलेसे करण्याच गुण प्रेरणा वरपुडकर यांच्यात दिसून येतो. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून वरपुडकरांच्या सुनबाईंनी शिक्षणाचे काम देखील सुरु केले आहे. एका राजकीय नेत्यात ज्या पध्दतीने गुण विकसित होतात अगदी त्याच पध्दतीने प्रेरणा वरपुडकर यांच्यातही ते गुण दिसून येत आहेत. मितभाषी व स्पष्टवक्तेपणा असल्याने अल्पावधीतच प्रेरणा वरपुडकरानी लोकांना आपलेसे केले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख