Parbhani election : intense struggle | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

 हस्ते -परहस्ते काटा काढण्याचे जोरदार प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

काही प्रभाग वाऱ्यावर... 
बहुतांश पक्षांनी विशिष्ट प्रभागावरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते. विविध पक्षांची नेतेमंडळी त्या-त्या प्रभागातच घिरट्या मारत आहेत. त्याचा अन्य प्रभागावर परिणाम होत असून त्या-त्या प्रभागातील उमेदवार आपल्या नेत्यांची रोज प्रतिक्षा करीत आहेत. नेतेमंडळींनी काही प्रभाग वाऱ्यावर सोडून दिल्याचे, त्यातून माघार घेतल्याचे दिसून येते 

परभणी: विविध पक्षातील नेतेमंडळी आम्ही एक असल्याचे, प्रचार सामुदायिकपणे व पक्षाच्या सर्वच उमेदवारांसाठी करतो असल्याचे सांगत असले तरी पक्षांतर्गत वितुष्ट कायम असून  हस्ते परहस्ते त्या-त्या प्रभागातील  विरोधी गटाच्या उमेदवारांचा काटा काढण्याचे प्रयत्न पध्दतशीरपणे सुरु आहेत. 
महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष मोठ्या ताकदीने, स्वतंत्ररित्या उतरले आहेत. प्रत्येक पक्ष व त्यांचे मोठे नेते महापालिकेवर झेंडा फडकावण्याचा दावा करत आहेत. परंतु त्यासाठीची जुळवाजुळवी मात्र सांगीतली जात नाही. या निवडणुकीसाठी काही पक्षांकडे काही प्रभागात तिकीटावरून युध्दसदृश परिस्थिती निर्माण झाली तर दुसरीकडे अनेक प्रभागात उमेदवार देखील सापडले नाहीत. त्यामुळे केवळ जागा भरण्याचे धोरण या पक्षांना स्विकारावे लागल्यामुळे अनेक प्रभागात त्यांना अतिशय कमकुवत उमेदवार देणे भाग पडले. त्यामुळे अनेक प्रभागात त्या-त्या पक्षांचे उमेदवार गिणतीतही नाहीत. त्यामुळे बहुतांश प्रभागात दुरंगी किंवा खुप झाले तर तिरंगी लढतीच होण्याची अधिक शक्यता आहे. 
एकीकडे अशी परिस्थीती असताना दुसरीकडे सर्वच पक्षांचे काही दिग्गज उमेदवार विविध प्रभागात विखुरले आहेत. अशा काही विजयाची संधी असलेल्या उमेदवारांच्या मागे पक्ष व नेत्यांनी पाठबळ लावणे गरजेचे असताना पक्षांतर्गत राजकारणातून त्यांना कशा पध्दतीने फडशा पाडायचा याचेच अधिक प्रयत्न होताना दिसून येत आहे. 
शहरात असे आठ ते दहा प्रभाग आहेत की जेथे आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना पाडण्यासाठी विविध हातखंडे आखले जात आहेत. त्या उमेदवाराच्या प्रभागात प्रचाराला, बैठकांना न जाणे, पक्षीय मदतीसाठी हात आखडता घेणे, त्या प्रभागातील अन्य उमेदवारांना ‘त्या’ उमेदवाराला सोबतीला न घेण्याचे सांगणे, त्या-त्या प्रभागातील अराजकीय व्यक्तींच्या माध्यमातून ‘त्या’ उमेदवाराच्या विरुध्द वातावरण तयार करणे, त्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न करणे, त्याच्याबद्दल अफवा पसरविणे असे वेगवेगळे हातखंडे आखले जात असून हे पक्ष व नेते स्वतःच्या हातानेच दगड पायावर पाडून घेत असल्याचे दिसून येते. 
पक्षांतर्गत या कारनाम्यांचे परिणाम सर्वदुर होण्याची शक्यता आहे. अगोदरच क्राॅस वोटींगची अधिक शक्यता आहे. त्यातच गटातील एखादा उमेदवार कमी पडला तर मतदारांच्या हाती आयतेच कोलीत येईल व त्याची झळ त्या गटातील पक्षांच्या उमेदवारांना देखील बसणारच आहे, हे विसरुन चालणार नाही. 
मतदान केवळ चार दिवसावर आलेले आहे. या कालावधीत गेल्या चार-आठ दिवसातील केलेल्या विरोधी खेळ्यांवर उपाय करण्याची संधी पक्ष व नेते मंडळींना आहे. केवळ पक्षाचा विचार करुन त्यांनी प्रयत्न केले तर काठावर असलेले अनेक उमेदवार विजयी होऊ शकतात व त्या-त्या पक्षाची लाॅटरी लागू शकते. 
 
काही प्रभाग वाऱ्यावर... 
बहुतांश पक्षांनी विशिष्ट प्रभागावरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते. विविध पक्षांची नेतेमंडळी त्या-त्या प्रभागातच घिरट्या मारत आहेत. त्याचा अन्य प्रभागावर परिणाम होत असून त्या-त्या प्रभागातील उमेदवार आपल्या नेत्यांची रोज प्रतिक्षा करीत आहेत. नेतेमंडळींनी काही प्रभाग वाऱ्यावर सोडून दिल्याचे, त्यातून माघार घेतल्याचे दिसून येते 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख