parbhani district president of bjp | Sarkarnama

पंकजा मुंडे यांच्या दबावामुळे परभणीच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड लांबली ?

गणेश पांडे
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

परभणी : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी एकमत न झाल्याने आज होणारी निवड पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, विद्यमान जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनाच परत जिल्हाध्यक्षपदावर ठेवण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दबाव वाढविल्याची चर्चा बैठकीच्या ठिकाणी रंगली होती. त्यामुळे बैठकीत काही काळ वादंग ही निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. 

परभणी : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी एकमत न झाल्याने आज होणारी निवड पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, विद्यमान जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनाच परत जिल्हाध्यक्षपदावर ठेवण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दबाव वाढविल्याची चर्चा बैठकीच्या ठिकाणी रंगली होती. त्यामुळे बैठकीत काही काळ वादंग ही निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. 

भारतीय जनता पक्षाच्या परभणी जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदाची निवडणुक सोमवारी एमआयडीसी परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात घेण्यात आली. प्रदेश शाखेच्यावतीने शिरीष बोराळकर व गंगाधरराव जोशी हे दोघे या निवडणुकीसाठी परभणीत आले होते. सकाळी 11 वाजता बैठकीस प्रारंभ झाला. परंतु सुरुवातीपासून बैठकीत उमेदवारीवरून वादंग उभे राहिले. विद्यमान जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या नावाला विरोध होत होता. त्यांना परत पदावर घेवू नये अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यांच्या ऐवजी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे नाव समोर केले जात होते. परंतू वाद वाढल्याने दोन्ही निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी काही काळ बैठक थांबविली. 

ग्रामीण साठी सात तर शहरासाठी पाच अर्ज 
ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी एकूण सात अर्ज आले होते. त्यात डॉ.सुभाष कदम, अभय चाटे, गणेशराव रोकडे, रामप्रभु मुंढे, श्रीराम मुंढे, बाबासाहेब जामगे, राजश्री जामगे, अशोक खताळ यांची नावे होती. तर महानगराध्यक्षपदासाठी आनंद भरोसे, बाळासाहेब भालेराव, प्रमोद वाकोडकर, मोकिंद खिल्लारे, मधुकर गव्हाणे यांची नावे होती. 

अभय चाटे यांना तीव्र विरोध 
ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अभय चाटे यांचे नाव समोर येत असल्याचे समजाताच बैठकीस हजर असणाऱ्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरु केला. अभय चाटे यांची परत जिल्हाध्यक्षपदी निवड करू नये अशी मागणी होत होती. अभय चाटे यांच्या नावाला माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थन मिळत असल्याने दबाव वाढला असल्याची चर्चा बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यामध्ये होत होती. त्यामुळे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, डॉ. सुभाष कदम, माजी आमदार मोहन फड किंवा जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यापैकी कुणा एकाकडे जिल्हाध्यपदाची जबाबदारी द्यावी अशी देखील मागणी देखील जोर धरु लागली होती. 
मधुकर गव्हाणे यांचा नावाला विरोध 
महानगराध्यक्षपदासाठी मधुकर गव्हाणे यांचे नाव समोर येत असल्याने त्यांच्याही नावाला विरोध होत होता. या ठिकाणी प्रमोद वाकोडकर यांच्याकडे महानगराध्यपदाची जबाबदारी द्यावी अशी मागणी होत होती. 
पुढील बैठक 12 फेब्रुवारीला 
परभणी महानगराध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी आज झालेल्या बैठकीत एकमत झाले नाही. या संदर्भात आम्ही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला परंतू त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने ही निवड प्रक्रिया पुढे ढकल्यात आली आहे. ती आता 12 फेब्रुवारी रोजी होईल. निवड प्रक्रियेसाठी कुणाचाही दबाव आला नाही. 
असे निवडणूक अधिकारी शिरीष बोराळकर यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख