परभणीतील बेघरांसाठी भाजपचे कम्युनिटी किचन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये परभणी शहरात अडकून पडलेल्या वेगवेगळ्या राज्यातील व स्थानिक बेघर मजुरांना भाजपच्या कम्युनिटी किचनाचा लाभ देण्यात येत आहे.
parbhani bjp starts community kitchen for homeless
parbhani bjp starts community kitchen for homeless

परभणी ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये परभणी शहरात अडकून पडलेल्या वेगवेगळ्या राज्यातील व स्थानिक बेघर मजुरांना भाजपच्या कम्युनिटी किचनाचा लाभ देण्यात येत आहे. भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या पुढाकारातून 40 बेघर कुटूंबांसाठी धान्य व इतर साहित्याचे वाटप करण्यास शनिवारी (ता.28) जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानात गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातून आलेले तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून कामासाठी आलेले बेघर असलेले ४० कुटुंब वास्तव्यास आहेत.

भाजपच्यावतीने 'कम्युनिटी किचन' या अभियाना अंतर्गत परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या वतीने या ४० कुटुंबांना पुढचे २० दिवस पुरेल अशी धान्याची रसद पुरविण्यात आली. या मध्ये गहू, तांदूळ, तेल, मसाला, स्वच्छतेसाठी साबण आदी साहीत्याचे वाटप परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, तहसीलदार विद्याचरण कडवकर, परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते शनिवारी (ता.28) करण्यात आले. यावेळी भाजपा मनपा गटनेता मंगल मुदगलकर, संजय शेळके, माणिक शिंदे, विशाल बोबडे, कोंडीबा कुंभारे, शेषराव खंदारे, राजू रिक्षे, धनंजय जाधव, अशोक पारवे, महेंद्र वैरागर, निलेश भरोसे आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या 21 दिवसाच्या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या वर्गाचा जेवण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात भाजपच्या वतीने  'कम्युनिटी किचन'चे जाळे उभारण्यात येत आहे. परभणी शहरात पण जे बेघर आहेत व ज्यांना धान्याची टंचाई भासत आहे त्यांना परभणी भाजपा महानगरच्या वतीने धान्य पुरविण्यात येणार आहे अशा गरजूंनी त्यांच्या प्रभागातील भाजपा मंडळ अध्यक्ष मंगल मुद्गलकर, मोकिंद खिल्लारे, भीमराव वायवळ, सुनिल देशमुख, सुहास डहाळे, विजय दराडे यांच्याशी संपर्क करावा अशी माहिती परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com