भाजपकडून परभणीतून भरोसे, गंगाखेडमधून चाटे, पाथरीतून फड तर जिंतूरमधून बोर्डीकर, दुधगावकर इच्छुक

भाजपकडून परभणीतून भरोसे, गंगाखेडमधून चाटे, पाथरीतून फड तर जिंतूरमधून बोर्डीकर, दुधगावकर इच्छुक

परभणी : एकीकडे युती होणार असल्याचे मुख्यमंत्री परभणीत सांगून गेले असतांना दुसऱ्याच दिवशी भाजपच्यावतीने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी घेण्यात आल्या. चारही मतदार संघात इच्छुकांची संख्या भली मोठी आहे. परभणीतून आनंद भरोसे, गंगाखेडमधून अभय चाटे, पाथरीतून आमदार मोहन फड तर जिंतूर मधून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघना बोर्डीकर व समीर दुधगावकर या सगळ्यांनी मुलाखती दिल्या आहेत. 

परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी (ता.31) येथील सावली या शासकीय विश्रामगृहात घेण्यात आल्या. पक्षाचे नेते तथा राज्यमंत्री संजय भेगडे यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. राज्यात सत्ता आल्यानंतर जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते जोमात आहेत. त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेपासून तर जिल्ह्यातील कमळ अधिकच फुलले आहे. चारही विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या इच्छुंकाची संख्या मोठी आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी परभणीमध्ये होते. त्यावेळी त्यांनी एका वाक्‍यात महायुती होईल असे सांगून पत्रकार परिषद आटोपती घेतली होती. परंतु मुख्यमंत्री बाजूच्याच नांदेड जिल्हयात असतांना परभणी जिल्ह्यातील चारहि विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती पक्षाच्यावतीने घेण्यात आल्या. सकाळी 10 वाजता सुरु झालेल्या मुलाखती सायंकाळपर्यत चालल्या. यात पाथरी विधानसभा मतदार संघासाठी विद्यमान आमदार मोहन फड, प्रा.पी.डी.पाटील, डॉ.मंजूषा चौधरी, शाम गलबे पाटील, बाबासाहेब फले, महादेव गिरे, रंगनाथ सोळंके, दत्तात्रय कदम, शिवाजी मव्हाळे, रमाकांत जहागीरदार, डॉ.उमेश देशमुख, हनुमान सावंत यांनी मुलाखती दिल्या. 

गंगाखेड विधानसभा मतदार संघासाठी अभय चाटे, बालाजी देसाई, सुरेश भुमरे, शामसुंदर मुंडे, लिंबाजी भोसले, अनंत बनसोडे, रमेश गोळेगांवकर, रामकिशन रौंदळे, विश्वनाथ सोळंके, विठ्ठल रबदडे, डॉ. सुभाष कदम, विजय गव्हाणे, रामप्रभू मुंडे, गणेश रोकडे, डॉ.रामराव केंद्रे, गणेश घोरपडे, डॉ.बडेसाब शेख यांनी मुलाखती दिल्या. परभणी विधानसभा मतदार संघासाठी आनंद भरोसे, डॉ.मीना परतानी, मोहन कुलकर्णी, मंगल मुद्गगलकर, अभिजीत धानोरकर, चंद्रकांत चौधरी, सुनिल देशमुख, रमेश गोळेगांवकर, शंकर भालेकर, अजय गव्हाणे यांनी मुलाखती दिल्या. जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघना साकोरे बोर्डीकर, समीर दुधगांवकर, गणेश काजळे, डॉ.माधव सानप, संजय साडेगांवकर, शशीकांत देशपांडे, राजेश वट्टमवार, खंडेराव आघाव, डॉ.गुलाब सांगळे, जिजाराव गिते, अशोक खताळ या इच्छुकांनी शनिवारी मुलाखती दिल्या. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com