Parbhani | Sarkarnama

कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न  परभणी जिल्हा परिषद, सत्तेसाठीची गोळाबेरीज सुरू 

गणेश पांडे :सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मार्च 2017

त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच अध्यक्ष व उपाध्यक्ष होणार हे आता निश्चित झाले आहे. गोळाबेरजेच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कॉंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. 

परभणी: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी (ता. २१) निवड होणार असून सर्वाधिक २४ जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना तीन सदस्यांची गरज आहे. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसला राष्ट्रीय समाज पक्षाच्या तीन सदस्याचा पाठिंबा मिळू शकतो.

त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच अध्यक्ष व उपाध्यक्ष होणार हे आता निश्चित झाले आहे. गोळाबेरजेच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कॉंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. 

परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक २४ जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल शिवसेना १३, कॉंग्रेस सहा, भारतीय जनता पक्ष पाच, राष्ट्रीय समाज पक्ष तीन, अपक्ष दोन व घनदाट मित्र मंडळाचा एक सदस्य आहे. सत्तेत विराजमान होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला २७ जागा हव्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्ह्यातील नेते रत्नाकर गुट्टे यांना सांगावा धाडला होता. रत्नाकर गुट्टे यांनीही हा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे समजते. 

परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेत मदत करण्यास कॉंग्रेसमधील काही नेते उत्सुक आहेत. समविचारीपक्षानी सत्तेत सहभागी व्हावे, असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटते. त्या दृष्टीने दोन्ही कॉंग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर समविचारी पक्षांच्या आघाडीबाबत विचारविनिमय सुरू आहे. कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगे पाटील यांचे चिरंजीव बाळासाहेब रेंगे पाटील हे सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे दोन्ही कॉंग्रेसची युती करावी, असे साकडे रेंगे समर्थकांनी घातले असल्याचे समजते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख