परशुराम उपरकर म्हणतात, राणेंच्या समर्थनार्थ नव्हे, जनतेसाठीच जेलभरो  

Parshuram_Uparkar..
Parshuram_Uparkar..

कणकवली : महामार्ग चौपदरीकरण दुरवस्थेबाबत सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आणि सत्तेतील मंत्र्यांनी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी खुनाचे गुन्हे दाखल करण्याची दिलेली धमकी या विरोधात सिंधुदुर्गातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांनी एकत्र येत 16 जुलै रोजी जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. हे जेलभरो कुणाच्या समर्थनार्थ नाही, तर जिल्ह्यातील जनतेसाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेने सहभाग घेऊन सत्ताधाऱ्यांविरोधातील राग व्यक्त करावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले.

कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. ते म्हणाले, गेली दीड वर्षे जिल्ह्यातील नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलने करून विविध प्रश्नांबाबत आवाज उठवीत आहेत. मात्र प्रशासनाकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. जनतेने निवडून दिलेले आमदार, खासदार, मंत्री हे अधिकाऱ्यांप्रमाणे जनतेची निवेदने घेऊन कारवाई करू, अशी आश्वासने देऊन जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत. या विरोधात मनसे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व विविध संघटना त्याचप्रमाणे जिल्ह्यातील हायवेबाधित जनता यांचा जेलभरो असून या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे. सदर आंदोलन कुणाच्या समर्थनासाठी नसून सत्ताधारी हे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्या विरोधात आंदोलन आहे.

सिंधुदुर्गातील जनतेची दिशाभूल करण्याची  कामे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करत असून जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मंत्र्यांच्या भेटीतून प्रश्न सुटल्याचे भासवून काम करीत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे सत्ताधारी करतआहेत .  जे प्रश्न गेल्या साडेचार वर्षापूर्वी होते तेच प्रश्न निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात असून मंत्र्यांसोबत बैठका घेऊन प्रश्न सोडविण्याच्या केवळ वल्गना केल्या जात आहेत, असेही  परशुराम उपरकर म्हणाले.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com