अजितदादांना 'क्लिन चिट' देणारे परमबीर सिंह बनले मुंबईचे पोलिस आयुक्त 

परम बीर सिंह यांनी नागपूर उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सिंचन गैरव्यवहारात अजित पवार यांना 'क्लिन चिट' दिली होती.
param bir singh appointed as cp mumbai
param bir singh appointed as cp mumbai

मुंबई: मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांची नुयुक्ती करण्यात आली आहे. परम बीर सिंह हे 1988 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.

परमबीर सिंह हे ठाणे पोलिस आयुक्तपदावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेची गणिते बांधली जात असतानाच परम बीर सिंह यांनी नागपूर उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सिंचन गैरव्यवहारात अजित पवार यांना 'क्लिन चिट' दिली होती. मंत्री नव्हे तर अधिकारी गैरव्यवहाराला जबाबदार असल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटले होते. 

यापार्श्वभुमीवर परमबीर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. राज्याचे गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असणे हेही याठिकाणी महत्वाचे ठरले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com