परळीत यंदा सत्ता 'पीएम'कडे की 'डीएम'कडे ?

४० वर्षांच्या राजकीय इतिहासात आताच्या परळी आणि पुर्वीच्या रेणापूर मतदार संघावर पंडितराव दौंड यांचा एक वेळेचा अपवाद वगळला तर मुंडेंचा दबदबा राहीलेला आहे. यात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाच वेळा, पंकजा मुंडे दोन वेळा तर दिवंगत रघूनाथराव मुंडे एक वेळा आमदार राहीले आहेत.
pankaja Munde dhananjay_munde
pankaja Munde dhananjay_munde

बीड : गेल्या ४० वर्षांत एकदा पंडितराव दौंड यांचा अपवाद वगळला तर परळी - रेणापूरवर कायम मुंडेंनीच बाजी मारली आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना दोनदा पराभव पत्कराव्या लागणाऱ्या या मतदार संघात १९७८ पासून आठ वेळा मुंडेच आमदार राहीलेले आहेत. 


आताही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात काट्याची टक्कर झाली आहे. येथून पंकजा मुंडेंसाठी ‘पीएम’ (पंतप्रधान) येऊन गेल्यानंतरही परळीत ‘डिएम’च (धनंजय मुंडे) असा नारा समर्थक लगावत आहेत. त्यामुळे मुंडेंचीच परळी आता पीएम कडे कि डीएम कडे याची चर्चा आहे.  


आताच्या परळी आणि पुर्वीच्या रेणापूर मतदार संघातून १९७८ साली पहिली निवडणुक लढविणाऱ्या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना दिवंगत रघूनाथराव मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, मतदार संघाचा आमदार मुंडेच राहीले. नंतर १९८० मध्ये विजयी झालेले  गोपीनाथराव  मुंडे पुन्हा १९८५ ला जेष्ठ नेते पंडितराव दौंड यांच्याकडून पराभूत झाले. पण, नंतर १९९० ते २००४ अशा सलग चार निवडणुका गोपीनाथराव मुंडेंनी एकहाती जिंकल्या. 


गोपीनाथराव यांनी २००९ पासून  राष्ट्रीय राजकारणातप्रवेश केल्यापासून मागच्या दोन टर्म त्यांच्या कन्या पंकजा मुंडे येथून आमदार आहेत. मागच्या वेळी पंकजा मुंडेंकडून पराभूत झालेले धनंजय मुंडे यंदा सर्व ताकदिनीशी मैदानात उतरले होते. हायव्होल्टेज झालेल्या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून शक्तीप्रदर्शन, आरोप - प्रत्यारोप झाले. अगदी इथे पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेल्यानंतरही स्वत:ची हवा टिकविण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरले होते. 


पण, शेवटचे दोन दिवस ही निवडणुक कथीत व्हिडीओ क्लिप आणि या मुंडे भावंडांच्या ‘भोवळ आणि आश्रुभोवतीच’ फिरली. त्यामुळे सुरुवातीला काट्याची टक्कर आणि भावनिक शेवट झालेल्या निवडणुकीच्या निकालाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात युतीची सत्ता येणार असल्याचे विविध यंत्रणांचे पाहणी अहवाल समोर येत आहेत. 


त्यामुळे भविष्यात संधी मिळाली तर पहिल्या महिला मुख्यमंत्री अशी आशा बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेच विजयी होतील असा विश्वास वाटत आहे. तर, सीएम येऊ किंवा पीएम परळीत तर ‘डिएम’ (धनंजय मुंडे) असा विश्वास धनंजय मुंडे समर्थकांना आहे. यावर पैजा आणि सट्टाबाजारही जोरात सुरु आहे. जिल्ह्यात इतर पाच विधानसभा मतदार संघांपेक्षा परळीचीच आकडेमोड अधिक आहे. आणखी काही  तासांनी परळी ‘पीएम’ (पंकजा मुंडे) ची कि ‘डीएम’ची (धनंजय मुंडे) हे कळणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com